शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

दंड आकारणीत ‘दंडे’लशाही

By admin | Updated: June 5, 2016 00:45 IST

औरंगाबाद : बांधकाम परवानगी मिळविण्यासाठी पूर्वी मनपाच्या नगररचना कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते.

औरंगाबाद : बांधकाम परवानगी मिळविण्यासाठी पूर्वी मनपाच्या नगररचना कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते. मागील काही दिवसांपासून बांधकाम परवानगीतील अनेक अडथळे दूर करण्याचा प्रयत्न मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सुरू केला आहे. ज्या नागरिकांना बांधकाम परवानगी देण्यात येते, त्यांना आता नवीन नियमानुसार जोत्याच्या पूर्णत्वाचे प्रमाणपत्र (प्लिंथ कम्प्लिशन सर्टिफिकेट) घेणे बंधनकारक केले आहे. ज्यांनी हे प्रमाणपत्र घेतले नाही, त्यांना १० हजार ते ३ लाख रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात येत आहे. शहरात आजही असंख्य नागरिक मनपाकडून बांधकाम परवानगी घेऊनच घर बांधतात. मनपाने विविध तांत्रिक कारणांमुळे परवानगी थांबवून ठेवल्यास नागरिक बांधकाम सुरूही करीत नाहीत. वर्षभरात १२०० ते १५०० नागरिक मनपाकडून बांधकाम परवानगी घेतात. ५ जानेवारी २०१६ पासून मनपाने विकास नियंत्रण नियमावलीमधील नियम क्र. ७.४ नुसार जोत्यापर्यंतचे बांधकाम झाल्यावर पूर्णत्वाचे प्रमाणपत्र घ्यावे. वास्तुविशारदामार्फत यासाठी स्वतंत्र प्रस्ताव दाखल करावा. असंख्य नागरिक बांधकाम परवानगी मिळविल्यानंतर जोत्याचे प्रमाणपत्र घेण्यास टाळाटाळ करतात. संपूर्ण बांधकाम झाल्यावर थेट भोगवटा प्रमाणपत्र घेण्यासाठी येतात. यामुळे चटई निर्देशांकाचे उल्लंघन करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे. ११ फेबु्रवारी २०१६ रोजी तत्कालीन मनपा आयुक्तांनी एक आदेश काढून जोत्याचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आदेशाची अंमलबजावणी ५ जानेवारी २०१६ पासून करावी, असे आदेशात म्हटले आहे.