शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

‘युपीएससी’चे शिखर पहिल्याच प्रयत्नात पादाक्रांत

By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST

उस्मानाबाद : प्राथमिक, माध्यमिक शिक्षण उस्मानाबाद येथे पूर्ण केल्यानंतर ‘एमबीबीएस’ चा अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या अनुषंगाने मुंबई येथे गेलेल्या रविराज खोगरेला

उस्मानाबाद : प्राथमिक, माध्यमिक शिक्षण उस्मानाबाद येथे पूर्ण केल्यानंतर ‘एमबीबीएस’ चा अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या अनुषंगाने मुंबई येथे गेलेल्या रविराज खोगरेला लोकसेवा आयोगाच्या परीक्षेने खुनावले. त्यानंतर खोगरे यांनी जमेल त्या पद्धतीने आणि वेळ मिळेल तेंव्हा तयारीला सुरुवात केली. कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर खोगरे यांनी पहिल्याच प्रयत्नात ‘युपीएससी’चे शिखर पादाक्रांत केले आहे. या यशानंतर त्यांनी प्रशासकीय सेवेत जाण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यांचे वडील येथील भोसले हायस्कुलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. रविराज खोगरे हे तसे सर्वसामान्य कुटुंबातीलच. वडील शाहुराज खोगरे हे भोसले हायस्कुलवर मुख्याध्यापक होते. त्यावेळी रविराजचे १२ वी पर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर रविराज यांनी एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी नवी मुंबई येथील तेरणा वैद्यकिय महाविद्यालयात प्रवेश घेतला. हा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत त्यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारीही सुरु केलेली होती. त्यानंतर २०१२ पासून मात्र त्यांनी या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला. हळुहळु अभ्यासाची वेळी वाढविली. मात्र अभ्यास करताना परीक्षा द्यायची आहे म्हणून अभ्यास न करता आपणाला काहीतरी शिकायचे आहे, असे गृहीत धरुन अभ्यास करीत गेलो. पुस्तकी अभ्यासासोबतच या क्षेत्रातील मार्गदर्शक यशस्वी झालेले व्यक्ती आणि वृत्तपत्र वाचनावरही तितकाच भर दिला. मुख्य परीक्षेची तयारी करताना दिवसातून किमान ६ ते ८ तास वेळ अभ्यासासाठी दिला असे रविराज यांनी सांगितले. खोगरे हे पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले असून, १ हजार १२२ विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा ६७३ वा क्रमांक आहे. (प्रतिनिधी)अभ्यासाकडे एन्जॉय म्हणून पाहिलेमुख्य परीक्षेची तयारी करताना कधीही ताण घेवून अभ्यास केला नाही. अभ्यासाकडे एन्जॉय म्हणून पाहिले. हेच आपल्या यशाचे गमक असल्याचे रविराजने आवर्जून सांगितले. स्पर्धा परीक्षाची तयारी करताना विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकात अडकून न राहता वेगवेगळ्या स्त्रोतांच्या माध्यमातून माहिती गोळा केल्यास तयारी अधिक सोपी होते, असा सल्लाही त्यांनी दिला. आपला प्रशासकीय सेवेत जाण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.