शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
3
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लान'
4
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
5
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
6
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
7
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
8
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
9
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
10
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
11
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
12
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
13
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
14
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
15
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
16
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
17
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
18
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
19
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
20
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
Daily Top 2Weekly Top 5

हजारो ग्राहकांना विलंब शुल्काचा भुर्दंड

By admin | Updated: June 26, 2016 00:42 IST

औरंगाबाद : महावितरण कंपनीच्या ढिसाळ कारभाराचा फटका चालू महिन्यातही शहरातील वीज ग्राहकांना बसला आहे. वीज बिल भरणा करण्याची अंतिम तारीख येऊनही

 

औरंगाबाद : महावितरण कंपनीच्या ढिसाळ कारभाराचा फटका चालू महिन्यातही शहरातील वीज ग्राहकांना बसला आहे. वीज बिल भरणा करण्याची अंतिम तारीख येऊनही असंख्य ग्राहकांना त्यांची बिले मिळालेली नाहीत. त्यामुळे शहरातील हजारो ग्राहकांना या महिन्यात विलंब शुल्काचा भुर्दंड बसणार आहे. शहरात महावितरणचे ३ लाख ८ हजार ग्राहक आहेत. या ग्राहकांना दर महिन्याला वीज बिल दिले जाते. महावितरणने हे काम खाजगी एजन्सीकडे सोपविलेले आहे. मात्र, गेल्या काही काळापासून चुकीची रीडिंग नोंदवून अव्वाच्या सव्वा बिले देणे, बिल देण्यास उशीर होणे, असे प्रकार एजन्सीकडून सुरू आहेत. चालू महिन्यातही शहरातील छावणी, सातारा, अलोकनगर, भाग्योदयनगर, देवळाई, बीड बायपास, हडकोतील एम-२, एन- ९, एन-२ यासह (पान १ वरून) किती तरी भागातील वीज ग्राहकांना चालू महिन्याची वीज बिले मिळालेली नाहीत. साधारणपणे १२ तारखेपर्यंत ही बिले मिळणे अपेक्षित असते. या बिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणकडून शेवटच्या तारखेनंतर विलंब शुल्क आकारले जाते. आता अंतिम तारीख जवळ येऊनही ग्राहकांना बिले मिळालेली नाहीत. त्यामुळे आता या ग्राहकांना बिल भरणा करण्यास उशीर होणार आहे. परिणामी त्यांना बिलाची रक्कम विलंब शुल्कासह भरावी लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. माहिती घेतली जाईल दोन-तीन भागांतील वीज बिले जनरेट होणे बाकी आहे. मात्र, इतर भागांतील बिले जनरेट झाली आहेत. त्याचे वाटप करण्यात आलेले आहे. एजन्सीकडून त्याची माहिती घेतली जाईल. - दिनेश अग्रवाल, अधीक्षक अभियंता एजन्सींवर नियंत्रण हवे वीज बिलाची रीडिंग घेणे आणि बिलांचे वाटप करण्यासाठी महावितरणने एजन्सीज् नियुक्त केलेल्या आहेत. या एजन्सींवर पूर्ण नियंत्रण गरजेचे आहे. मात्र तसे होत नाही. त्यामुळे ग्राहकांना भुर्दंड बसतो आहे. अधीक्षक अभियंत्यांनी यात लक्ष घालून आवश्यक कारवाई केली पाहिजे. - हेमंत कपाडिया, ग्राहक प्रतिनिधी, वीज नियामक आयोग