तळणी: मंठा तालुक्यातील तळणी, जयपूर व दहिफळ खंदारे या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत राष्ट्रीय कृषी पीक विमा २०१४-१५ योजनेतंर्गत १३,५०० सभासदांनी ९६ लाख ५१ हजार रुपयांचा पीक विमा ३१ जुलैपर्यत उतरविला आहे. मात्र, अद्यापही अनेक शेतक री वंचित आहेत. राष्ट्रीय कृ षी पीक विमा २०१४-१५ योजनेतंर्गत जिल्हा मध्यवती सहक ारी बँकेच्या तळणी येथील शाखेत ५ हजार सभासदांनी ३२ लाख ६४ हजार रु पयाचा पीक विमा क ाढला असल्याचे शाखाधिकारी राजेश म्हस्के यांनी सांगितले. दहीफळ खंदारे येथील शाखेत ५ हजार सभासदांनी ३७ लाख ४७ हजार रु पयांचा पीक विमा क ाढलाअसल्याचे शाखाधिक ारी एफ .ए. पवार व भागचौकसनीस एम.एस.बटाणे यांनी सांगितले. जयपूर येथील शाखेत ३ हजार ५०० सभासदांनी २६ लाख ४० हजार रुपयांचा पीकविमा उतरविला असल्याचे शाखाधिकारी पी.आर खराबे यांनी सांगितले. ३१ जुलैपर्यंत पीकविमा उतरविला आहे. पीकविमा क ाढण्याची तारीख वाढविल्याने अनेक शेतक री बँके त गर्दी क रीत आहेत. मात्र, बँकेतील कर्मचारी हे तलाठी यांनी १ आॅगस्ट नंतर पेरणी प्रमाणपत्र दिलेल्या शेतक ऱ्यांच्या पीक विमा उतरवित आहे. मात्र, अनेकांनी ३१ जुलै पूर्वीच पेरणी प्रमाणपत्र घेतलेल्या शेतकऱ्यांच्या पीकविमा घेतला जात नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी व्यक्त होत आहे. या बाबत तळणी शाखेचे शाखाधिकारी राजेश म्हस्के यांना विचारले असता, पीकविमा भरण्यासाठी १६ आॅगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली आहे. १ आॅगस्ट नंतरचे पेरणी प्रमाणपत्र तलाठ्यांचे जोडणे आवश्यक आहे. (वार्ताहर)
मंठ्यात ९६ लाखांचा उतरविला पीकविमा
By admin | Updated: August 7, 2014 23:35 IST