शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

५५ कोटींचा उतरविला पीकविमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 23:36 IST

यावर्षी तब्बल ६ लाख ४३ हजार शेतकºयांनी सुमारे ५५ कोटींचा पिकविमा उतरविला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : यावर्षी तब्बल ६ लाख ४३ हजार शेतकºयांनी सुमारे ५५ कोटींचा पिकविमा उतरविला आहे. एकीकडे पिकविमा भरणाºया शेतकºयांची संख्या गतवषीर्पेक्षा सव्वा लाखाने वाढली असली तरी दुसरीकडे प्रिमीअमची रक्कम मात्र गतवषीर्पेक्षाही कमी झाली आहे. यावर्षी शेतकºयांनी केवळ कापसाऐवजी इतर पिकांचाही विमा मोठ्या प्रमाणात उतरविल्याने प्रिमीअमची रक्कम कमी झाल्याचे निरीक्षण अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय चव्हाण यांनी नोंदविले आहे.यावर्षी पेरणीनंतरपासून पावसाने जिल्ह्यात दडी मारल्याने खरीप पिके सुकू लागली असून पिके हातची जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून ही वाढ झाली. गतवर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीपेक्षाही जास्त म्हणजेच तब्बल १२५ टक्के इतका पाऊस झाला होता. गतवर्षी पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. गतवर्षी जिल्ह्यातील ५ लाख ५ हजार शेतकºयांनी ५७ कोटींचा पिकविमा भरला होता. यावर्षी सुरूवातीलाच चांगला पाऊस झाला. यामुळे दरवषीर्पेक्षा यंदा पेरण्याही लवकर उरकण्यात आल्या. मात्र पिकांची उगवण झाल्यापासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. यामुळे पिके हातची जाण्याचा धोका निर्माण झाला असून बहुतांश भागातील पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत.पिकांची परिस्थिती वाईट असल्याने यावर्षी पिकविमा उतरविण्याला शेतकºयांनी पसंती देत आपली पिके संरक्षित करून घेतली. यावर्षी राष्ट्रीयीकृत बँक तसेच जिल्हा बँकेत मिळून ४ लाख ४३ हजार २०४ शेतकºयांनी एकूण ३४ कोटी ९८ लक्ष ६९ हजारांचा पिकविमा भरला. याशिवाय ई-महासेवा केंद्रांवर आॅनलाईन पद्धतीने १ लाख ८७ हजार शेतकºयांनी तर ५ आॅगस्टला ई-महासेवा केंद्रांवर आॅफलाईन पद्धतीने १२ हजार ९११ शेतकºयांनी जवळपास २० कोटींचा पिकविमा भरला आहे. जिल्ह्यात यंदा खरीपाच्या पिकांसाठी एकूण ६ लाख ४३ हजार शेतकºयांनी जवळपास ५५ कोटींचा पिकविमा उतरविला आहे.बँकांमध्ये भरलेल्या पिकविम्याचा विचार केल्यास सर्वाधिक १३ कोटी १३ लाख रूपयांचा पिकविमा जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये भरण्यात आला आहे. याखालोखाल महाराष्ट्र ग्रामीण बँक व स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये भरण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.