शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पाटोदा ग्रा.पं.ला केंद्र शासनाचा ८ लाखांचा पुरस्कार

By admin | Updated: August 7, 2014 01:56 IST

वाळूज महानगर : केंद्र शासनाच्या पंचायत सबलीकरण व उत्तरदायित्व प्रोत्साहन योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीला ८ लाखांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला

वाळूज महानगर : केंद्र शासनाच्या पंचायत सबलीकरण व उत्तरदायित्व प्रोत्साहन योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीला ८ लाखांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. १४ आॅगस्टला पुणे येथे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेअंतर्गत राज्यातील ८३३ ग्रामपंचायतींना ‘पर्यावरण विकास रत्न व पंचायत सबलीकरण व उत्तरदायित्व प्रोत्साहन योजनेअंतर्गत पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. या ग्रामपंचायतीने लोकसहभागातून गावात विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. गावात शुद्ध पाणी पुरवठ्याचे योग्य व्यवस्थापन, ग्रामपंचायतीचे संगणकीकृत अद्ययावत अभिलेखे, वृक्ष लागवड, नियमितपणे मासिक व ग्रामसभेचे आयोजन, कचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. पाटोदा गावात राबविण्यात आलेल्या ‘पाटोदा पॅटर्न’ची सर्व राज्यभर चर्चा आहे. ग्रामपंचायतीने राबविलेल्या या उपक्रमाची दखल घेऊन केंद्र शासनाचा ८ लाख रुपयांचा मानाचा पुरस्कार या ग्रामपंचायतीला जाहीर झाला आहे. १४ आॅगस्टला पुणे येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींच्या उपस्थितीत हा पुरस्कार पाटोदा ग्रामपंचायतीला प्रदान करण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, गटविकास अधिकारी विजय परदेशी यांनी सरपंच दत्तात्रय शहाणे, उपसरपंच हरिश्चंद्र मातकर, माजी सरपंच भास्करराव पा. पेरे, ग्रामविकास अधिकारी आर.डी. चौधरी यांनी ग्रामपंचायतीचे व ग्रामस्थांचे कौतुक केले. सरपंच शहाणे, उपसरपंच मातकर, माजी सरपंच भास्करराव पा. पेरे, ग्रामविकास अधिकारी आर.डी. चौधरी, चंद्रकांत पेरे, बबनराव पेरे, बाळसाहेब पेरे, अप्पासाहेब मुचक, उत्तम पवार, कल्याण पेरे, सखाराम मातकर, बबनराव मुचक, देवचंद पेरे आदींनी आनंदोत्सव साजरा केला.या ग्रामपंचायतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, यशवंत पंचायत राज अभियान, पर्यावरण विकास रत्न, पर्यावरण संतुलित समृद्ध योजना, निर्मलग्राम, दलित वस्ती सुधार योजना, साने गुरुजी स्वच्छ व सुंदर शाळा, अंगणवाडी इ.सह जवळपास ५० लाखांवर पारितोषिके मिळविली आहेत. पारितोषिकांच्या रकमेचा विनियोग गावात विविध उपक्रम राबविण्यासाठी केला जात असल्याचे माजी सरपंच भास्कर पा.पेरे, सरपंच दत्तात्रय शहाणे, उपसरपंच हरिश्चंद्र मातकर, ग्रामविकास अधिकारी आर.डी. चौधरी यांनी सांगितले.