औरंगाबाद : एमजीएम दवाखान्यात उपचार घेत असलेल्या रुग्णाचा तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना काल रात्री घडली. पोलिसांनी सांगितले की, सिल्लोड तालुक्यातील वडाळा येथील शेतकरी अप्पासाहेब दगडू शेळके (४७) आजारी असल्याने त्यास ७ आॅगस्ट रोजी उपचारासाठी एमजीएम उपचारासाठी दाखल केले होते. त्याच्यावर तिसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होता. रात्री झोप न आल्याने बारा- साडेबारा वाजता अप्पासाहेब पलंगावरून उठून बाहेर गॅलरीत गेला. सिडीजवळ उभा असताना तो अचानक तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. रुग्ण खाली पडून जोरदार आवाज झाल्याने एकच गोंधळ उडाला. नातेवाईक व सुरक्षारक्षकांंनी जखमी अप्पासाहेब यांना अपघात विभागात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याविषयी सिडको ठाण्यात नोंद करण्यात आली असून, अधिक तपास जमादार महेमूद पठाण करीत आहेत.
तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने रुग्ण ठार
By admin | Updated: August 10, 2014 02:07 IST