शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

धूत ट्रान्समिशनची ‘कार्लिंग’सोबत भागीदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:41 IST

येथील धूत ट्रान्समिशनने भारतात इलेक्ट्रो-मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक स्विचेसची निर्मिती आणि विक्रीसाठी अमेरिकेतील कनेक्टिकट येथील कार्लिंग टेक्नॉलॉजीजबरोबर संयुक्त भागीदारीसाठी सामंजस्य करार केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : येथील धूत ट्रान्समिशनने भारतात इलेक्ट्रो-मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक स्विचेसची निर्मिती आणि विक्रीसाठी अमेरिकेतील कनेक्टिकट येथील कार्लिंग टेक्नॉलॉजीजबरोबर संयुक्त भागीदारीसाठी सामंजस्य करार केला आहे.नव्या भागीदारी कंपनीचे नाव अद्याप निश्चित नाही. कंपनीचे मुख्यालय औरंगाबादमध्ये असेल. या संयुक्त भागीदारीतील कंपनीकडून निर्मित उत्पादने ही भारतातील दुचाकी, तीनचाकी आणि वाणिज्य वाहने, कृषी आणि बांधकाम उपकरणांच्या बाजारपेठेला पुरविली जातील. त्या उत्पादनांची कार्लिंग टेक्नॉलॉजीजच्या नेटवर्कने विदेशात निर्यात केली जाईल.कार्लिंग टेक्नॉलॉजीजचे कार्यकारी उपाध्यक्ष ख्रिस्तोफर सोरेन्सन कराराप्रसंगी म्हणाले, धूत ट्रान्समिशनशी भागीदारी होणे ही घटना उत्साहवर्धक आहे. या करारामुळे भारतातील आमचा पाया आणखी मजबूत होईल. या भागीदारीतून भारताच्या वाहन उद्योगातील बाजारपेठेतील विविध पैलूंची माहिती होईल. शिवाय उत्पादनांच्या स्थानिकस्तरावर निर्मितीमुळे ते किफायतशीर किमतीला पुरविणे शक्य होणार आहे.मुंबईचे जागतिक गुंतवणूक सल्लागार बँकिंग संस्था सिंघी अ‍ॅडव्हायजर्सने धूत ट्रान्समिशनच्या या करारात अंतर्गत सल्लागाराची भूमिका बजावली. धूत ट्रान्समिशनचे व्यवस्थापकीय संचालक राहुल धूत या करारासंबंधी म्हणाले, जागतिकस्तरावर असलेले बँ्रडनेम आणि आमच्या व्यावसायिक दृष्टिकोनाशी अनुकूल असलेल्या कार्लिंग टेक्नॉलॉजीजशी सामंजस्य करार होणे खूप आनंददायी आहे. आजवर आमच्यासाठी उपेक्षित राहिलेल्या बाजारपेठेत शिरकावासाठी ही भागीदारी उपयुक्त ठरेल. कार्लिंग टेक्नॉलॉजीजचे तंत्रज्ञान उत्पादनासाठी महत्त्वाचे ठरेल. २०१८ मध्ये ही भागीदारी अंमलात येणे अपेक्षित आहे.