शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंगच्या फायली महापालिकेतून गायब

By admin | Updated: July 18, 2016 01:12 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या नगररचना विभागात मागील अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अलीकडेच बदल्या करण्यात आल्या.

औरंगाबाद : महापालिकेच्या नगररचना विभागात मागील अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अलीकडेच बदल्या करण्यात आल्या. बदल्या करण्यापूर्वी काही कर्मचाऱ्यांनी अनेक इमारतींशी संबंधित पार्किंगच्या अत्यंत महत्त्वपूर्ण फायली गायब केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात दोषींनी आठ दिवसांमध्ये फायली जमा न केल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिले आहेत.शहरातील अनेक बांधकाम व्यावसायिकांनी मनपाकडून बांधकाम परवानगी घेताना पार्किंगसाठी ऐसपैस जागा दाखविलेली असते. प्रत्यक्षात बांधकाम झाल्यावर पार्किंगच्या जागेवर दुकाने, फ्लॅट, गोदामाचे बांधकाम करण्यात येते. बांधकाम व्यावसायिकांनी पार्किंगची सोय न केल्याने सर्वसामान्य नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागतो. शनिवारी मनपा आयुक्त बकोरिया यांनी नगररचना विभागाची आढावा बैठक घेतली. बैठकीत नव्यानेच बदलून आलेल्या काही कनिष्ठ अभियंत्यांना पार्किंगच्या फायलींबद्दल विचारणा करण्यात आली. सर्वांनी आम्हाला चार्ज देताना फायली मिळाल्याच नाहीत, असे सांगितले. कर्मचाऱ्यांचे हे उत्तर ऐकून आयुक्तही क्षणभर अवाक झाले. आठ दिवसांमध्ये गहाळ झालेल्या फायली शोधून काढा. फायली उपलब्ध न करून दिल्यास फौजदारी कारवाई करा, असे आदेश आयुक्तांनी दिले.