शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

रेल्वेस्थानकावरील पार्किंगचा खर्च झाला एकदम दुप्पट...

By admin | Updated: June 12, 2014 01:33 IST

औरंगाबाद : रेल्वेस्थानकावरील पार्किंगच्या दरात दुप्पट वाढ झाली असल्यामुळे अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांना तिकिटाच्या खर्चापेक्षा पार्किंगसाठीच जास्त पैसे मोजावे लागत आहेत.

औरंगाबाद : रेल्वेस्थानकावरील पार्किंगच्या दरात दुप्पट वाढ झाली असल्यामुळे अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांना तिकिटाच्या खर्चापेक्षा पार्किंगसाठीच जास्त पैसे मोजावे लागत आहेत. पार्किंगचे दर वाढल्यामुळे काही मिनिटांसाठी दुचाकीचालकांना १० रुपये, तर चारचाकीचालकांना २० रुपये मोजावे लागत आहेत. या वसुलीमुळे वाहनचालक आणि पार्किंग चालकांमध्ये वाद होत आहेत.औरंगाबाद रेल्वेस्थानकावर येणारे प्रवासी व वाहनांची संख्या पाहता यंदा दक्षिण मध्य रेल्वेने पार्किंगच्या कंत्राटाची रक्कम वाढविली. १ मेपासून आगामी तीन वर्षांसाठी नव्या कंत्राटदाराकडे पार्किंगची व्यवस्था असून, दुचाकीसाठी पूर्वीचे ५ रुपये आज १० रुपये करण्यात आले आहेत. स्टेशनवर प्रवाशांना सोडण्यासाठी आलेल्यांना काही मिनिटांसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. नोकरी, व्यवसायानिमित्त नियमितपणे ये-जा करणाऱ्यांनाही या दरवाढीचा फटका बसला आहे. यामुळे गेल्या महिन्यापासून वाहनचालक आणि पार्किंगचे काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी होत आहे. रेल्वे प्रशासनेच दरवाढीला संमती दिल्यामुळे अधिकारीही पार्किंगचे दर योग्य असल्याचे सांगतात.पार्किंगवाल्यांची अरेरावीदुचाकीसाठी सहा तासांसाठी १०, बारा तासांसाठी २० तर २४ तासांसाठी ४० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र, पार्किंगवाल्यांकडून मनमानी पद्धतीने पैसे वसूल केले जात आहेत.दर फलक लावलेला असताना पार्किंगचालक अनेकदा १२ तासांसाठी ४० रुपये वसूल करून अरेरावी करीत आहेत. पावती देण्याचेही अनेकदा टाळले जाते.उन्हात वाहनेपार्किंगचे दर वाढविण्यात आले असले तरी गेल्या अनेक वर्षांत पार्किंगच्या सुविधेत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. शेड नसल्यामुळे भरउन्हात, पावसात वाहने उभी करावी लागतात.कंत्राट २.४४ कोटींचे२.४४ कोटी रुपयांत पार्किंगचे कंत्राट घेण्यात आल्याची माहिती पार्किंगच्या व्यवस्थापकांनी दिली आहे. एवढी मोठी रक्कम आणि कर्मचाऱ्यांचे वेतन, नफा आदी खर्च तीन वर्षांत वाहनचालकांकडूनच वसूल केला जाणार असे दिसते. दिलेल्या दरानुसार१ मेपासून पार्किंगचे कंत्राट नव्या कंत्राटदाराकडे गेले आहे. पार्किंगचे दर वाढलेले असले तरी ते रेल्वेने मान्य केलेले आहेत. शहरातील इतर ठिकाणीही पार्किंगचे दर असेच आहेत. - के. बापूराव, चीफ कमर्शियल इन्स्पेक्टरतिकिटांपेक्षा पार्किंगचा खर्च जास्तऔरंगाबाद रेल्वेस्थाकाच्या पार्किंगचे कंत्राट देशातील सर्वाधिक मोठ्या रकमेचे ठरले आहे. अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांना तिकिटांपेक्षा पार्किंगसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. आचारसंहितेमुळे दरवाढीला विरोध करता आला नाही. झालेली दरवाढ रद्द करून जुने दर ठेवण्याची गरज आहे. -संतोषकुमार सोमाणी, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे प्रवासी सेनावाढीव दराची कल्पनारेल्वे प्रशासनाच्या सूचनेप्रमाणेच दर निश्चित करण्यात आले आहेत. सुरुवातीलाच आम्ही स्वत: पार्किंगच्या वाढीव दरामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींची कल्पना रेल्वे प्रशासनाला दिली होती. पार्किंगच्या दराविषयी संभ्रम, शंका व्यक्त करणाऱ्यांना योग्य माहिती दिली जाते. दराची माहिती देणारे फलकही लावण्यात आले आहेत.-मोहम्मद नईम, व्यवस्थापक, पार्किंग