शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

मूलं गमावलेल्या पालकांची प्रशासनाकडूनही उपेक्षा !

By admin | Updated: November 25, 2015 23:23 IST

बीड : जिल्ह्यात राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजनेंतर्गत २०१२ पासूनचे दावे प्रलंबित आहेत. उल्लेखनीय हे की, मंजूर दावे ३९ असून केवळ २६ जणांचे अनुदान शासनाकडून आले आहे

बीड : जिल्ह्यात राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजनेंतर्गत २०१२ पासूनचे दावे प्रलंबित आहेत. उल्लेखनीय हे की, मंजूर दावे ३९ असून केवळ २६ जणांचे अनुदान शासनाकडून आले आहे. ज्या पालकांनी आपला पोटचा गोळा गमावला त्यांची प्रशासनाकडूनही अशी उपेक्षा सुरु आहे. २००३ पासून राज्यभरातील विद्यार्थ्यांना शासनाने सुरक्षाकवच दिले आहे. विद्यार्थी अपघातात किंवा इतर काही कारणांमुळे जखमी झाले किंवा त्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या पालकांना आर्थिक मदतीची तरतूद या योजनेतून केली आहे. जखमींना ३० हजार रुपये तर मयत विद्यार्थ्यांच्या पालकांना ७५ हजार रुपये दिले जातात. त्यानुसार २०१२ पासून २०१४ पर्यंत ३९ विद्यार्थ्यांचा वेगवेगळ्या अपघातांत मृत्यू झाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ३९ विद्यार्थ्यांची अनुदान प्रकरणे मंजूर केली. मात्र, शासनाकडून केवळ २६ जणांना पुरेल इतका १९ लाख ५० हजार रुपये इतका निधी प्राप्त झाला आहे. उर्वरित ९ लाख ७५ हजार रुपये येणे बाकी आहे. त्यामुळे स्वत:चे मूल तर गमावले; परंतु सानुग्रह अनुदानासाठीही प्रतीक्षा करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.दरम्यान, शिक्षण विभागाने नुकतेच या योजनेचे धनादेश तयार केले आहेत. लवकरच त्याचे वितरण होईल, असे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले.सभापतींनी घातले लक्षजि.प. चे आरोग्य व शिक्षण सभापती बजरंग सोनवणे यांनी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ संबंधितांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वत: पुढाकार घेतला. २०१२ पासूनचे प्रलंबित दावे निकाली काढण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार समितीची मंजुरी घेऊन पात्र पालकांचे धनादेश तयार झाले.