शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

परभणीतील जलकुंभाचे काम रखडले

By admin | Updated: September 12, 2014 00:07 IST

परभणी : सुजल निर्मल अभियानांतर्गत राजगोपालचारी उद्यान आणि रामकृष्णनगर येथे सुरू करण्यात आलेले जलकुंभाचे काम मागील काही महिन्यांपासून रखडले आहे.

परभणी : सुजल निर्मल अभियानांतर्गत राजगोपालचारी उद्यान आणि रामकृष्णनगर येथे सुरू करण्यात आलेले जलकुंभाचे काम मागील काही महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे शहरवासियांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.परभणी शहरात पाण्याची समस्या निर्माण झाल्याने २००९ मध्ये महाराष्ट्र शासनाने सुजल निर्मल अभियानांतर्गत शहरी भागातील नागरिकांच्या पाण्याची समस्या दूर व्हावी, या उद्देशाने पाणीपुरवठा योजना मंजूर केली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी अनुदान दिले जाते. परभणी नगरपालिका असताना हे अनुदान मंजूर करण्यात आले. त्यासाठी लागणारा २९ लाख रुपयांचा लोकवाटा २०११ मध्ये अदा करुन योजनेसाठी मिळणारे अनुदान प्राप्त करण्यासाठी अर्हता पूर्ण केली आहे. या योजनेअंतर्गत राजगोपालचारी उद्यान आणि रामकृष्णनगर या ठिकाणी जलकुंभ उभारण्याचे नियोजन करण्यात आले. ११ नोव्हेंबर २०१२ रोजी राजगोपालचारी उद्यानातील जलकुंभाच्या पायाभरणीचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. परंतु आजतागायत हे काम रखडले आहे. दोन्ही ठिकाणच्या जलकुंभाची क्षमता २४ लाख लिटर एवढी आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.दरम्यान, या प्रश्नावर भारिप-बहुजन महासंघाने एक सविस्तर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. महानगरपालिका अभियंत्याकडून या कामाचा प्रगती अहवाल मागवून घ्यावा, अहवाल समाधानकारक नसल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी, योजना राबविण्यात कोठे त्रुटी आहे किंवा अडथळे आहेत ते दूर करण्यासाठी उपाययोजना करुन नागरिकांची पाण्यासाठी होणारी हेळसांड थांबवावी, अशी मागणी भारिप- बहुजन महासंघाने केली आहे. या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या या निवेदनावर बाबासाहेब जाधव, भाऊसाहेब गुळवे, सचिन गंगाखेडकर, गौतम रणखांबे, संदीप खाडे, नितीन लहाने, अनुरथ झोडपे, किशन गवळे, सखाराम उजागर, साहेबराव साळवे, मोतीराम सौंदडकर, नामदेव ढेपे, रामराव सावंत, अमोल सिरसमकर, भानुदास सावंत, प्रकाश वाकळे, बुद्धभूषण जाधव, उमेश वारकर, प्रशांत कांबळे, श्रवण इंगोले, किरण डुमने, विशाल मगरे आदींची नावे आहेत.या वसाहतींना होणार फायदाया दोन्ही जलकुंभाचे काम पूर्ण होऊन पाणीपुरवठा सुरू झाल्यास वजिराबाद, गुलजार कॉलनी, बरकर नगर, सेवकनगर, राहत कॉलनी, कॅनाल झोेपडपट्टीचा भाग, धाररोड स्थित झोपडपट्टी, अशोकनगर, फुले कॉलनी, मरीमाता मंदिर परिसर, गुलशनबाग, युसूफ कॉलनी परिसर, सहयोग कॉलनी, मकदूमपुरा, पार्वतीनगर, राहूलनगर, जवाहर कॉलनी, ज्ञानेश्वरनगर, मोची कॉलनी, सारनाथ कॉलनी, श्रीनिवास कॉलनी, डी.आर.बी. कॉलनी, गांधीनगर, मराठवाडा प्लॉट परिसर, गणेशनगर, खाजा कॉलनी, पोस्टमन कॉलनी, राजाराणी मंगल कार्यालय परिसर, स्वच्छता कॉलनी, नगरपरिषद कॉलनी, बँक कॉलनी, दर्गा रोड, गणेशनगर, सुभेदारनगर, इकबालनगर, दादाराव प्लॉट, वकील कॉलनी, लहुजीनगर आदी वसाहतींना फायदा होणार आहे.