शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
3
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
4
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
5
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
7
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
8
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
9
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
10
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
11
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
12
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
13
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
14
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
15
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
16
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
17
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
18
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
19
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
20
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

औरंगाबाद विभागात परभणी जिल्हा शेवटच्या क्रमांकावर

By admin | Updated: June 13, 2017 17:57 IST

दहावीच्या परीक्षेत जिल्ह्याचा ८०.८९ टक्के निकाल लागला असून औरंगाबाद विभागामध्ये परभणी जिल्हा गतवर्षी प्रमाणे याही वर्षी शेवटच्या स्थानकावर

ऑनलाइन  लोकमतपरभणी, दि. १३-  दहावीच्या परीक्षेत जिल्ह्याचा ८०.८९ टक्के निकाल लागला असून औरंगाबाद विभागामध्ये परभणी जिल्हा गतवर्षी प्रमाणे याही वर्षी शेवटच्या स्थानकावर फेकला गेला आहे. 
दहावीच्या परीक्षेसाठी परभणी जिल्ह्यातून २९ हजार ९६२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी २९ हजार ५१४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. २३ हजार ८७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याची जिल्ह्याची टक्केवारी ८०.८९ टक्के एवढी आहे. इतर जिल्ह्यांच्या निकाल पहाता परभणी जिल्हा औरंगाबाद विभागात शेवटच्या स्थानावर राहिला आहे. विशेष म्हणजे गतवर्षीही जिल्हा शेवटच्याच स्थानावर होता. गतवर्षी जिल्ह्याचा ७७.८० टक्के निकाल लागला होता.
या वर्षी जिल्ह्यातील ४ हजार ५८२ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून ८ हजार ५२६ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये ८ हजार ४०७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये आणि २ हजार ३६० विद्यार्थी उत्तर्णी श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. 
तालुकानिहाय निकालामध्ये जिंतूर तालुक्याने बाजी मारली आहे. जिंतूर तालुक्याचा निकाल ८६.३८ टक्के लागला असून गंगाखेड तालुक्याचा ८३.१० टक्के, परभणी तालुक्याचा ८१.१० टक्के, सेलू तालुक्याचा ८०.७४ टक्के, पाथरी तालुक्याचा ७९.५० टक्के, पूर्णा तालुक्याचा ७९.३६ टक्के, पालम तालुक्याचा ७९.२६ टक्के, सोनपेठ तालुक्याचा ७५.८४ टक्के आणि मानवत तालुक्याचा निकाल ७०.२५ टक्के लागला आहे. 
३० शाळांचा निकाल १०० टक्के
परभणी जिल्ह्यामध्ये ४१३ शाळांमधून विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी ३० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. या शाळांमध्ये विवेकानंद इंग्लिश स्कूल, विश्वशांती ज्ञानपीठ राहटी, फरान उर्दू स्कूल परभणी, नॅशनल उर्दू हायस्कूल परभणी, कै.काळदाते गुरुजी विद्यालय परभणी, के.टी.कत्रुवार कर्णबधीर विद्यालय परभणी, व्हीपीएस जवाहर नेहरु इंग्लिश स्कूल पूर्णा, एस.ए. सेकंडरी स्कूल पाथरी रोड परभणी, अमन उर्दू स्कूल परभणी, ज्योर्तिगमय इंग्लिश स्कूल परभणी, फैजान हक उर्दू स्कूल, ओयासीस इंग्लिश स्कूल, बाल विद्यामंदिर, इंद्रायणी माध्यमिक विद्यालय, ज्ञानसाधना प्रतिष्ठान पब्लिक स्कूल, व्यंकटेश माध्यमिक विद्यालय, वेदांत माध्यमिक विद्यालय गंगाखेड, गोल्डन ड्रिम्स् इंग्लिश माध्यमिक विद्यालय, बायनाबाई माध्यमिक विद्यालय शेंडगा, छत्रपती शिवाजी विद्यालय राणीसावरगाव, एस.भूवन हायस्कूल तांदुळवाडी, कै.विठाबाई जी.बोचरे माध्यमिक विद्यालय कोथाळा, जिजामाता माध्यमिक विद्यालय सोनपेठ, विश्वभारती सेकंडरी स्कूल सोनपेठ, सरस्वती माध्यमिक विद्यालय, गडदगव्हाण, माध्यमिक विद्यालय विटा बु. (ता.पाथरी), खान अब्दुल गफ्फारा खान उर्दू हायस्कूल सेलू आणि ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालय.
तीन शाळांचा निकाल शून्य टक्के
जिल्ह्यातील तीन शाळांना भोपळाही फोडता आलेला नाही. त्यामध्ये शांतीनिकेतन पब्लिक स्कूल नांदेड रोड मालेवाडी, जि.प.हायस्कूल आडगाव खंडागळे, कै.सौ.सूमनताई केंद्रीय माध्यमिक निवासी आश्रमशाळा सेलू या शाळांचा समावेश आहे. 
दहावीच्या निकालातही मुलींची आघाडी
नेहमीप्रमाणेच दहावीच्या निकालामध्येही मुलींनी बाजी मारली आहे.  जिल्ह्यात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८६.७९ टक्के आहे तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ७६.८४ टक्के आहे. परभणी जिल्ह्यातून १२ हजार १५१ मुलींनी दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १२ हजार ३३ मुलींनी परीक्षा दिली. त्यात १० हजार ४४३ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तालुकानिहाय निकालामध्ये सर्वच तालुक्यामध्ये मुलींनी आघाडी घेतली आहे. तालुकानिहाय मुलींचे उत्तीर्णतेची टक्केवारी अशी- (कंसात मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी) परभणी ८६.२५ (७८.०६), पूर्णा ८६.६५ (७३.७२), गंगाखेड ८९.४४ (७९.१६), पालम ८६.०८ (७५.०५), सोनपेठ ८५.३१ (६६.६७), जिंतूर ८८.७७ (८४.४७), पाथरी ८६.३० (७३.९५), मानवत ८२.४२ (६०.९३), सेलू ८६.७६ (७५.७४) आणि  जिल्ह्यात मुलींचे ८६.७९ टक्के मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण असून त्या तुलनेत ७६.८४ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.