शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी लोकसभेची भाजपकडून तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:37 IST

परभणी लोकसभा मतदार संघ ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून तयारी सुरू करण्यात आली असून, या अनुषंगाने बुधवारी या मतदार संघाचे प्रभारी तथा उत्तर प्रदेशचे आरोग्य राज्यमंत्री डॉ़ महेंद्रसिंह यांनी कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेवून त्यामध्ये जिल्ह्यातील बुथ मजबुतीकरणाचा मंत्र दिला़ तसेच भाजप सरकारने घेतलेल्या योजनांची सर्वसामान्यांपर्यंत माहिती पोहचविण्याचे आदेश दिले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी लोकसभा मतदार संघ ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून तयारी सुरू करण्यात आली असून, या अनुषंगाने बुधवारी या मतदार संघाचे प्रभारी तथा उत्तर प्रदेशचे आरोग्य राज्यमंत्री डॉ़ महेंद्रसिंह यांनी कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेवून त्यामध्ये जिल्ह्यातील बुथ मजबुतीकरणाचा मंत्र दिला़ तसेच भाजप सरकारने घेतलेल्या योजनांची सर्वसामान्यांपर्यंत माहिती पोहचविण्याचे आदेश दिले़भाजपाच्या वतीने २०१९ मध्ये होणाºया लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे़ या अनुषंगाने परभणी लोकसभा मतदार संघासाठी प्रभारी म्हणून पक्षाचे उत्तर प्रदेशचे आरोग्य राज्यमंत्री डॉ़ महेंद्रसिंह यांची नियुक्ती केली आहे़ त्या अनुषंगाने मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी बुधवारी डॉ़ महेंद्रसिंह परभणीत आले होते़ यावेळी शिवाजी महाविद्यालयातील सभागृहात घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी परभणी लोकसभा मतदार संघातील १९०० बुथचे मजबुतीकरण करण्याचा कार्यकर्त्यांना सल्ला दिला़ प्रत्येक बुथवर ५१ कार्यकर्त्यांची नियुक्ती करून त्यामध्ये शेतकरी, वकील, डॉक्टर्स, त्या परिसरातील प्रतिष्ठीत व्यक्तींचा समावेश करावा व केंद्र व राज्य सरकारने जनहिताच्या घेतलेल्या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवावी, असे आदेश दिले़ प्रत्येक बुथवरील किमान १० कार्यकर्त्यांकडे वाहन असले पाहिजे़ जेणे करून निवडणुकीच्या काळात मतदारांना मतदानासाठी आणण्याकरीता ते उपयोगी होईल़ तसेच येत्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला देशात ४०० जागा जिंकायच्या आहेत़ त्यामुळे त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आदेशही त्यांनी दिले़ यावेळी व्यासपीठावर पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, जिल्हाध्यक्ष अभय चाटे, महानगर अध्यक्ष आनंद भरोसे, विभागीय महामंत्री देशमुख, डॉ़ प्रफुल्ल पाटील, मेघना बोर्डीकर आदींसह परभणी जिल्ह्यातील ४ व जालना जिल्ह्यातील २ विधानसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकाºयांची उपस्थिती होती़