शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
8
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
9
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
10
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
11
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
12
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
13
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
14
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
15
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
16
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
17
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
18
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
19
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
20
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी

परंड्यात पार्थिव ठेवले रस्त्यावर

By admin | Updated: January 16, 2015 01:07 IST

परंडा : अपघातानंतर कारचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या कात्राबाद ग्रामस्थांनी गुरुवारी

परंडा : अपघातानंतर कारचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या कात्राबाद ग्रामस्थांनी गुरुवारी दुपारी मयताचे पार्थिव पोलीस ठाण्याजवळील चौकातील रस्त्यावर आणून ठेवले़ जवळपास तीन तास हे प्रेत भरचौकात ठेवण्यात आले होते़ यावेळी मयताचे नातेवाईक आणि पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती़मिळालेल्या माहितीनुसार, कात्राबाद येथील धनाजी गैबी शिनगारे व त्यांच्या पत्नी संगिता हे दोघे बार्शी तालुक्यातील मांजरे देवगाव येथे गेले होते़ ते दोघे गुरुवारी सकाळी दुचाकीवरून (क्ऱएम़एच़२५- ए़ए़५०७९) गावाकडे येत होते़ त्यांची दुचाकी बार्शी-परंडा राज्य मार्गावरील आसू फाट्याजवळ आली असता पाठीमागून आलेल्या कारने जोराची धडक दिली़ या अपघातात धनाजी शिनगारे व त्यांच्या पत्नी हे दोघे गंभीर जखमी झाले़ जखमींना उपचारासाठी बार्शी येथील रूग्णालयात नेण्यात आले होते़ मात्र, उपचार सुरू असताना धनाजी यांचा मृत्यू झाला तर संगिता शिनगारे या गंभीर जखमी झाल्या आहेत़ दरम्यान, सकाळी अपघात झालेला असताना सायंकाळपर्यंत परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नसल्याचे मयताच्या नातेवाईकांना समजले़ त्यानंतर मयताचे पार्थिव थेट परंडा पोलीस ठाण्याकडे आणण्यात आले़ पोलिसांनी नातेवाईकांना अडविल्यानंतर ठाण्याच्या शेजारीच असलेल्या शिवाजी चौकातील रस्त्यावर मयताचे पार्थिव ठेवण्यात आले़ संबंधित कारचालक महिलेविरूध्द गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी मयताच्या नातेवाईकांनी जवळपास तीन तास ठिय्या मांडला होता़ यावेळी पोलीस आणि नातेवाईकांमध्ये शाब्दीक बाचाबाचीही झाली़ कारचालक महिलेविरूध्द गुन्हा दाखल केल्यानंतर मयताचे पार्थिव अंत्यविधीसाठी नेण्यात आले़ मयत धनाजी शिनगारे यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे़