शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

परभणी मतदारसंघात ५ हजार कोटींचे रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 23:45 IST

परभणी : केंद्र शासनाने परभणी लोकसभा मतदारसंघात ५ हजार ३०२ कोटी रुपयांच्या रस्त्यांना मंजुरी दिली असून या रस्त्यांची कामे दोन वर्षात पूर्ण करायची आहेत, अशी माहिती जिल्ह्याचे संपर्कमंत्री तथा पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी येथे बोलताना दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : केंद्र शासनाने परभणी लोकसभा मतदारसंघात ५ हजार ३०२ कोटी रुपयांच्या रस्त्यांना मंजुरी दिली असून या रस्त्यांची कामे दोन वर्षात पूर्ण करायची आहेत, अशी माहिती जिल्ह्याचे संपर्कमंत्री तथा पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी येथे बोलताना दिली.परभणी येथील महात्मा फुले विद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना लोणीकर म्हणाले की, परभणी लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांची झालेली दुरवस्था लक्षात घेऊन नव्याने रस्ते तयार करण्यासाठी निधीची आपण केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली होती. त्यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर गडकरी यांनी मतदारसंघासाठी तब्बल ५ हजार ३०२ कोटी रुपये मंजूर केले असून परभणीच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी मोठी रक्कम विकासकामांसाठी उपलब्ध झाली आहे. या रस्त्यांच्या कामाच्या निविदा काढण्यात आल्या असून या कामाचे भूमिपूजन २९ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता परतूर तालुक्यातील वाटूरफाटा येथे नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. येत्या दोन वर्षात या रस्त्यांचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. मंजूर झालेल्या रस्त्यांमध्ये जालना-वाटूरफाटा-जिंतूर-बोरी-झरी- परभणी या रस्त्याच्या कामाचा समावेश असून यासाठी ८५६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा रस्ता मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गाला जोडणारा असल्यामुळे परभणीपासून मुंबईचे अंतर केवळ ६ तासांचे राहणार आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकºयांचा शेतमाल थेट मुंबईच्या बाजारपेठेत पोहोचवता येणार आहे. शिवाय या भागातील उद्योगधंद्यांनाही यामुळे चालना मिळणार आहे.