शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
5
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
6
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
7
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
8
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
9
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
10
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
11
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
12
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
13
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
14
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
16
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
17
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
18
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
19
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!

पंडित विरूद्ध पवार सामना रंगणार

By admin | Updated: June 10, 2014 00:34 IST

सखाराम शिंदे, गेवराई मागील अनेक वर्षांपासून गेवराई मतदारसंघावर पंडितांचेच अधिराज्य राहिलेले आहे़ पंडितांच्या भावकीचा वाद चव्हाट्यावर आला; परंतु आमदारकीचा मान पंडितांनाच हे ठरलेले

सखाराम शिंदे, गेवराईमागील अनेक वर्षांपासून गेवराई मतदारसंघावर पंडितांचेच अधिराज्य राहिलेले आहे़ पंडितांच्या भावकीचा वाद चव्हाट्यावर आला; परंतु आमदारकीचा मान पंडितांनाच हे ठरलेले गणित़ यावेळी समीकरणे बदलली आहेत़ दोन्ही पंडितांची ताकद एकवटल्याने भाजपाची कसोटी लागणार आहे़ पंडितांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी पवार यांच्याशी होणारी ‘स्ट्रेट फाईट’ रोमांचक होणारआहे.गेवराई विधानसभा मतदारसंघात २००९ मध्ये बदामराव पंडित व अमरसिंह पंडित या काका- पुतण्यात लढाई झाली़ राष्ट्रवादीच्या बदामरावांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत अमरसिंहांचा निसटता पराभव केला़ त्यानंतर अमरसिंहांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथराव मुंडे यांची साथ सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला़ ‘बक्षिसी’ म्हणून त्यांना विधान परिषदेवर संधी मिळाली़ नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बदामराव व अमरसिंह यांना शरद पवार यांनी एका मंचावर आणले़ विळ्या-भोपळ्याचे नाते असलेले हे दोन भिडू एकत्रित आल्याने पक्षाची ताकद वाढेल असे सर्वांनाच वाटले; परंतु त्याची ‘रिअ‍ॅक्शन’ झाली अन् मुंडे यांना तब्बल ३१ हजारांचे ंमताधिक्य मिळाले़ अमरसिंह पंडित मुंडेंपासून दुरावल्यानंतर माधवराव पवार हे मुंडेंच्या बाजूने उभे राहिले़ भाजपाचा ढासळलेला बुरूज सावरण्याचे काम माधवराव पवारांचे चिरंजीव अ‍ॅड़ लक्ष्मण पवार यांनी केले़ दोन्ही पंडितांसोबत टक्कर देत त्यांनी मुंंडेंचे मताधिक्य वाढविण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली़ त्यामुळे त्यांचा सराव झाला आहे़ आता विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांना भाजपाच्या मागची ताकद कायम ठेवावी लागेल़ राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा बदामराव पंडित यांनाच संधी मिळेल, हे जवळपास निश्चित आहे़ खुद्द शरद पवार यांनीच बदामराव यांच्या नावावर गेवराईच्या सभेत शिक्कामोर्तब केले आहे, तर भाजपाकडे अ‍ॅड़ लक्ष्मण पवार यांच्याशिवाय दुसरा स्ट्राँग उमेदवार दिसत नाही़ भाजपाचे नेते व केंद्रीय मंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनानंतर आता अ‍ॅड़ लक्ष्मण पवार एकाकी पडले आहेत़ पवारांना ‘वन मॅन आर्मी’ची भूमिका निभवावी लागेल़ शिवसेना, रिपाइं, रासप या छोट्या मित्रपक्षांच्या हातात हात घालून त्यांना दोन्ही पंडितांशी झुंजायचे आहे़ सोयऱ्यांची लढत!अमरसिंह पंडित व बदामराव पंडित हे कट्टर विरोधक एकत्रित आहेत़ ८ जि़प़ सदस्य, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, दूध संघ ही राष्ट्रवादीची ताकद़ मात्र, पंडितांच्या एकीची लोकसभेतील ‘रिअ‍ॅक्शन’ विधानसभेतही राहिली तर राष्ट्रवादीपुढील अडचणी वाढतील़ पवार व पंडित हे सोयरे आहेत़ यापूर्वी माधवराव पवार यांनी शिवाजीराव पंडित यांना आस्मान दाखविले होते़ तब्बल दोन तपानंतर आता पुन्हा एकदा पवार, पंडित असा थेट सामना रंगेल़ सोयऱ्यांची ही लढाई लक्षवेधी ठरेल़