शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पे्रेमाचा केला चक्क ‘बाँड’

By admin | Updated: July 14, 2016 01:37 IST

औरंगाबाद : एका महाविद्यालयीन तरुणीवर दबाव टाकून तरुणाने चक्क ‘आमचे दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. आम्ही स्वखुशीने लग्न करणार आहोत’ असा बाँड लिहून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

औरंगाबाद : एका महाविद्यालयीन तरुणीवर दबाव टाकून तरुणाने चक्क ‘आमचे दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. आम्ही स्वखुशीने लग्न करणार आहोत’ असा बाँड लिहून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या बाँडच्या आधारे तो तरुण तरुणीला गेल्या सहा महिन्यांपासून ‘ब्लॅकमेल’ करीत होता. ब्लॅकमेलिंगला वैतागलेल्या तरुणीने अखेर काल छावणी ठाणे गाठून फिर्याद दिली. अमजद खान अजमेर खान (२४, रा. जाधववाडी) असे त्या तरुणाचे नाव असून, त्याला छावणी पोलिसांनी बुधवारी पहाटे अटक केली. घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, पडेगाव परिसरात राहणारी एक २३ वर्षीय तरुणी घाटी परिसरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेते. काही महिन्यांपूर्वी आरोपी अमजद खानची तिच्यावर नजर पडली. तेव्हापासून त्याने तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. पाठलाग करता करता तिच्याशी ओळख करून घेतली. नंतर मैत्री केली. जवळीक वाढविली. धमकावून घेतल्या बाँडवर स्वाक्षऱ्यासहा महिन्यांपूर्वी ती क्लासला जात असताना आरोपी अमजदने रस्त्यात तिला अडविले अन् अचानक एक बाँडपेपर तिच्यासमोर ठेवला. त्यावर स्वाक्षरी मार, असे त्याने तिला बजावले. अन्यथा तुला बदनाम करील, असे अमजदने तिला धमकावले. तरुणीने बाँडपेपरवर स्वाक्षरी मारली. त्यानंतर तिने बाँडवरील मजकूर वाचला. तेव्हा तिला धक्काच बसला. त्यावर लिहिलेले होते ‘आमचे दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. आम्ही स्वखुशीने लग्न करणार आहोत’. बाँडच्या आधारे ब्लॅकमेलिंगबाँडवर स्वाक्षऱ्या घेतल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून आरोपी अमजद या तरुणीला सतत ब्लॅकमेलिंग करीत होता. माझ्याशी लग्न कर, माझ्यासोबत चल, असे तो तिला म्हणत असे. त्यामुळे ही तरुणी प्रचंड वैतागून गेली होती. तक्रार केली तर आपलीच बदनामी होईल, अशी भीती तिला सतावत होती. दरम्यान, १२ जुलै रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास ही तरुणी पीईएस महाविद्यालयासमोरून जात असताना अमजदने तिला पुन्हा अडविले आणि ‘तू आता माझ्यासोबत चल’ असे तो म्हणू लागला. त्याने तिचा हात धरून ओढले. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली. त्याच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेऊन या तरुणीने अखेर थेट छावणी पोलीस ठाणे गाठले आणि घडलेली हकीकत सांगितली. लगेच पोलिसांनी तिच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविल्यानंतर आरोपीचा शोध सुरू केला. अखेर तो जाधववाडीत राहत असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे फौजदार आर. डी. सौदागर व त्यांच्या सहकाऱ्यांनी बुधवारी पहाटे आरोपी अमजदला घरातून अटक केली. फौजदार सौदागर या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. तरुण ट्रॅक्टरचालक अन् तरुणी ‘बीएचएमएस’लाधक्कादायक बाब म्हणजे फिर्याद देणारी तरुणी ही शहरातील एका महाविद्यालयात बीएचएमएसचे शिक्षण घेत आहे. तर तिच्याकडून धमकावून प्रेमाचा बाँड लिहून घेणारा आणि लग्नासाठी तिच्या मागे लागलेला आरोपी अमजद खान अजमेर खान हा चक्क एका ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करतो.