शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

पैठण रोड हस्तांतरण प्रकरण तळ्यात-मळ्यात

By admin | Updated: October 20, 2016 01:40 IST

औरंगाबाद : पैठण रोडच्या रुंदीकरण आणि चौपदरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाऐवजी नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाकडून करण्यासाठी

औरंगाबाद : पैठण रोडच्या रुंदीकरण आणि चौपदरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाऐवजी नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाकडून करण्यासाठी मध्यंतरी सुरू झालेल्या हालचाली सध्या गुलदस्त्यात गेल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने २२ कोटी ५० लाख रुपयांतून पुन्हा डांबरीकरणाचे काम सुरू केले असून, बिडकीन येथे त्या कामाचे भूमिपूजन ३ आॅक्टोबर रोजी पार पडले. सध्या कामाला सुरुवात झाली आहे. पैठण रोडचे नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाकडून काम करून घ्यायचे ठरल्यास १६०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एवढा निधी तातडीने उभा करणे शक्य नाही. तसेच ते काम हस्तांतरित करण्याप्रकरणी हायवे अ‍ॅथॉरिटीला अद्याप काहीही सूचना आलेल्या नाहीत. एनएचएआयने त्या रस्त्याचे काम करावे. यासाठी बांधकाम विभागाने केंद्रीय दळणवळण खात्याला पत्र दिले आहे. त्यानंतर मुंबईला बांधकाम विभाग आणि एनएचएआयमध्ये तीन बैठका झाल्या; परंतु त्या रस्त्याच्या हस्तांतरणाप्रकरणी काहीही निर्णय झाला नाही. नरकयातना देणारा आणि अपघातांना निमंत्रण देणारा तो रस्ता औरंगाबादकरांसाठी मृत्यूचा सापळा झालेला आहे. ६ वर्षांपासून या रस्त्यासाठी चार वेळा वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आल्या. पूर्वीच्या आघाडी सरकारने काढलेले बीओटीचे ३८६ कोटी रुपयांचे कंत्राट विद्यमान सरकारने रद्द केले. त्यानंतर हा रस्ता बांधकाम विभागाने करण्यासाठी बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले. सुरुवातीला २२ कोटी रुपये आणि नंतर पुन्हा ३० कोटी रुपयांतून या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे अंदाजपत्रक तयार झाले आहे.