शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज न भरण्याची शपथ

By admin | Updated: June 28, 2017 00:29 IST

नांदेड: शासन निर्णयानुसार नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रूपये कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: शासन निर्णयानुसार नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रूपये कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही़ या निर्णयाने संतापलेल्या चालू बाकीदार शेतकऱ्यांनी नियमित कर्ज फेडणे हा गुन्हा आहे का, असा प्रश्न उपस्थित केला़ तसेच अर्धापूर तालुक्यातील शंभरांवर शेतकऱ्यांनी एकत्र येत यापुढे कर्ज न भरण्याची सामूहिक शपथ घेतली़ दरम्यान, तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले़ मराठवाड्यातील शेतकरी संपाची ठिणगी अर्धापूर तालुक्यातूनच पडली होती़ त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाणात अर्धापूर तालुक्यातील शेतकरी संपकाळात रस्त्यावर उतरले होते़ दरम्यान, कर्जमाफीवर चर्चा करण्यासाठी आणि आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी अर्धापूर येथील लंगडे कॉम्प्लेक्स येथे शेतकऱ्यांच्या वतीने मंगळवारी बैठक घेण्यात आली़ थकबाकीदार शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपये कर्जमाफी देण्याच्या निर्णयाबद्दल कुणाचेही दुमत नाही़, परंतु जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करून चालू बाकीदार आहेत, त्यांना प्रोत्साहन अनुदान देत कर्जमाफीच्या लाभापासून वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली़ चालू बाकीदार शेतकऱ्यांना थकित शेतकऱ्यांप्रमाणे कर्जमाफी मिळावी, यासाठी शासनाच्या विरोधात आंदोलन उभारण्याचा संकल्प करुन कर्ज न भरण्याची शपथ उपस्थित शेकडो शेतकऱ्यांनी घेतली.तसेच या अन्यायाविरोधात आंदोलन उभे करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुन्हा रस्त्यावर येण्याची गरज असल्याचे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे गव्हाणे यांनी सांगितले़ यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड़ किशोर देशमुख, आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष बालाजी आबादार, युवक काँग्रेसचे सरचिटणीस दत्ता पाटील बंडाळे, माजी सरपंच उद्धवराव राजेगोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील टेकाळे, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमाकांत तिडके, सरपंच शहानंद मुधळ, संजय कंकाळ, अ‍ॅड़ बालाजी कदम, उत्तमराव मुधळ, बालाजी मुधळ, केशव डाढाळे, सुदाम बंडाळे, नगरसेवक शिवराज जाधव, तुकाराम साखरे, बबनराव बंडाळे, डिगा बंडाळे, समद खान पठाण, बालाजी कदम, मारोती जाधव, दत्तराव क्षीरसागर, बालाजी कानोडे, नारायण मुधळ, बहिर्जी वानखेडे, ज्ञानेश राजेगोरे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते़ त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले़