शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

‘शाळाबाह्य विद्यार्थी हे शिक्षकांचेच अपयश’

By admin | Updated: January 10, 2017 23:54 IST

बीड : यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मंगळवारी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत शिक्षण परिषद पार पडली.

बीड : शिक्षकांकडून समाजाला फार मोठ्या अपेक्षा आहेत. शिक्षक हा विद्यार्थ्यांसोबत समाजाला दिशा देत असतो. मात्र, जिल्ह्यात ऊसतोड मजुरांच्या पाल्यांच्या शिक्षणाची होणारी ससेहोलपट म्हणजे शिक्षकांचे अपयश समजावे लागेल, अशा शेलक्या शब्दांत शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी खडेबोल सुनावले.यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मंगळवारी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत शिक्षण परिषद पार पडली. यावेळी सीईओ नामदेव ननावरे, शिक्षण उपसंचालक व्ही.के. खांडके, डेप्युटी सीईओ धनवंतकुमार माळी, सुभाष कांबळे, शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुधीर देवगावकर, शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर, विक्रम सारुक उपशिक्षणाधिकारी अकसरी शेख, हिरालाल कराड यांची उपस्थिती होती.यावेळी नंदकुमार म्हणाले, शिक्षकांनी स्वत:ला झोकून देऊन ज्ञानदान केले तर शाळांची गुणवत्ता उंचावल्याशिवाय राहत नाही. विद्यार्थ्यांना आता पारंपरिक पद्धतीने अध्यापन न करता ज्ञानरचनावाद यासारख्या प्रगतशील उपक्रमांची जोड देणे आवश्यक बनले आहे. शाळा बोलक्या झाल्या, विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण दिले तरच त्यांना शाळेची गोडी लागेल. शाळाबाह्य विद्यार्थी केवळ शैक्षणिक वातावरणाच्या अभावामुळे शिक्षणापासून वंचित आहेत, असेही ते म्हणाले.यावेळी सीईओ नामदेव ननावरे यांच्यासह इतर मान्यवरांची भाषणे झाली. प्रास्ताविक शशिकांत हिंगोणेकर यांनी केले. सूत्रसंचालन विस्तार अधिकारी जी.एन. चोपडे यांनी केले. यावेळी विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विस्तार अधिकारी तुकाराम पवार, भगवान सोनवणे, संगणकतज्ज्ञ सुरेंद्र रणदिवे यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)