शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

‘आमचं गाव आमचा विकास’ अर्ध्यावरच...!

By admin | Updated: November 19, 2016 00:56 IST

जालना : चौदाव्या वित्त आयोगातून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ग्रामपंचायतीला देण्यात आलेला कोट्यवधी रूपये कोठे खर्च करणार याचा संपूर्ण आराखडा आॅनलाईन पाठवावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

जालना : चौदाव्या वित्त आयोगातून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ग्रामपंचायतीला देण्यात आलेला कोट्यवधी रूपये कोठे खर्च करणार याचा संपूर्ण आराखडा आॅनलाईन पाठवावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी फ्लॅन्टप्लस हे नवीन सॉफटवेअर तयार केले आहे. परंतु अद्याप सॉप्टवेअर अद्ययावत झाले नसल्याने आराखडा पाठविण्याचे काम रखडल्याचे सूत्रांनी सांगितले.‘आमचं गाव आमचा विकास’ या उपक्रमासंदर्भात जिल्ह्यातील ७७९ ग्रामपंचायतींनी चौदाव्या वित्त आयोगातून देण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील लाखो रूपये कोणत्या कामांवर खर्च करणार, याचा अद्ययावत आराखडा शासनाला पाठविण्याच्या सूचना ग्रामीण विकास मंत्रालयाकडून संबंधित जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाला देण्यात आलेल्या आहेत. २०१६ मध्ये प्राप्त झालेल्या निधीतून पहिल्या वर्षाचा आराखडा जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी तयार केला आहे. तरी काही ग्रामपंचायतींचे आराखड्याचे काम सुरू असल्याचे पंचायत विभागाचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी राजेश इंगळे यांनी सांगितले. काही तालुक्यांचे आराखडे पाठविण्याच्या तयारीत असताना ग्राम विकास मंत्रालयाच्या वतीने फ्लॅन्टप्लस नवीन सॉप्टवेअरमध्ये आराखडे पाठविण्याच्या सूचना दीड महिन्यांपूर्वीच आल्या आहेत. परंतु अद्याप सॉप्टवेअर अद्ययावत नसल्याने आराखडा पाठविण्यास अडचणी येत असल्याचे इंगळे म्हणाले. ग्रामसेवकांचे आंदोलन सुरू असल्याने यावर परिणाम झाला आहे. ग्रामसेवकांचे आंदोलन संपल्यास पुन्हा त्याकडून त्या-त्या तालुक्याच्या बीडीओमार्फत कामे करून घेण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)