शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

अन्यथा संघर्षाची भूमिका घेऊ

By admin | Updated: October 13, 2016 01:01 IST

औरंगाबाद : शासनाने जारी केलेला २७ नोव्हेंबर २०१५ रोजीचा निर्णय मागे घेतला पाहिजे. उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमातील शिक्षकांवर अन्याय आता सहन केला जाणार नाही.

औरंगाबाद : शासनाने जारी केलेला २७ नोव्हेंबर २०१५ रोजीचा निर्णय मागे घेतला पाहिजे. उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमातील शिक्षकांवर अन्याय आता सहन केला जाणार नाही. शासनाने याची दखल घ्यावी, अन्यथा आम्हाला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा महाराष्ट्र व्होकेशनल टीचर्स असोसिएशनचे राज्याध्यक्ष डॉ. युगल रायलू यांनी दिला. सिंचन भवनमध्ये महाराष्ट्र व्होकेशनल टीचर्स असोसिएशनच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. रायलू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संघटना वाढीसंबंधी चर्चा झाली. जिल्हानिहाय संघटनेचे जाळे निर्माण करण्याची जबाबदारी राज्य कार्यकारिणी सदस्यांवर सोपविण्यात आली. त्यानंतर व्होकेशनल टीचर्सबाबत सरकारच्या उदासीन धोरणावर बराच खल झाला. शासनाने २७ नोव्हेंबर २०१५ रोजी जारी केलेल्या निर्णयाद्वारे पुनर्रचित अभ्यासक्रम लागू केला. मात्र या निर्णयात अनेक त्रुटी आहेत. त्या दूर केल्या पाहिजेत. या निर्णयातील त्रुटी या विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या आहेत. पूर्वीप्रमाणे व्यवसाय अभ्यासक्रमासाठी २० अधिक ५ अशी विद्यार्थी संख्या ठेवली जावी, तासिका तत्त्वावरील शिक्षकांना आताही केवळ ६५ रुपये प्रती तास मानधन दिले जाते. ते अत्यंत तुटपुंजे आहे. सध्याच्या महागाईनुसार ५०० रुपये प्रती तास मानधन करण्यात यावे, या इतर अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. मराठवाडा व्होकेशनल टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मनोहर वानखडे यांनी या विभागातील संघटनेच्या कार्याची माहिती दिली, तसेच विविध ठरावांचे वाचन केले. व्यासपीठावर संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. रायलू, मराठवाडा अध्यक्ष डॉ. वानखडे, प्रा. संदीप रेवतकर, प्रा. जयंत भाभे, प्रा. प्रकाश तराळे, प्रा. प्रकाश हमणे, प्रा. संजय विसपुते, प्रा. वर्षा ढवळे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रामदास गायकवाड यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रा. भालचंद्र येडवे यांनी मानले. राज्यस्तरीय बैठकीच्या यशस्वीतेसाठी प्रा. विजय पाटील, प्रा. राजपूत, प्रा. महम्मद एजाज, प्रा. राजेश नागे आदींनी परिश्रम घेतले.