शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

विशेष बैठकीचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:17 IST

४६४ कोटी रुपयांच्या भूमिगत गटार योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक अहवाल मागील आठवड्यात स्थायी समितीला सादर करण्यात आला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात राबविण्यात आलेल्या ४६४ कोटी रुपयांच्या भूमिगत गटार योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक अहवाल मागील आठवड्यात स्थायी समितीला सादर करण्यात आला आहे. या अहवालावर चर्चा करण्यासाठी बुधवारी सकाळी ११ वाजता स्थायी समितीच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.योजनेतील त्रुटींचा शोध घेण्यासाठी स्थायी समितीने मुख्य लेखापरीक्षक दीपाराणी देवतराज यांची नियुक्ती केली होती. त्यांनी स्थायी समितीला २५ मुद्यांवर आधारित ४० पानांचा सविस्तर अहवाल सादर केला आहे. योजनेत मोठी अनियमितता झाली असून, दोषींवर त्वरित कारवाई करावी, अशी शिफारस त्यांनी केली आहे. साडेचारशे कोटी रुपयांच्या योजनेत मोजमाप पुस्तिकांमध्ये (एम.बी. बुक) प्रचंड अनियमितता आढळून आली आहे. अनेक एम.बी. चौकशीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. योजनेच्या सुधारित डीपीआरला शासनाची मंजुरीच घेण्यात आलेली नाही. सहापैकी चार ठिकाणीच जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचा निर्णय झाला. हे केंद्र उभारण्यापूर्वीच कंत्राटदाराला पैसे देऊन टाकण्यात आले.खिल्लारी इन्फ्रास्ट्रक्चर या संस्थेला काम ३०.६८ टक्के अधिक दराने दिले. त्यामुळे ३५५ कोटींची योजना ४६४ कोटींवर गेली. त्यामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. निविदा देतानाही प्रचंड अनियमितता झाल्याचे अहवालात नमूद केले आले. योजनेचे काम करणाºया कंत्राटदाराला अगोदर एसबीआर टेक्नॉलॉजीच्या आधारावर ठरलेल्या दरानुसार काम करावे, असे सांगण्यात आले. नंतर हेच काम मॉर्डन टेक्नॉलॉजी पद्धतीवर करून घेण्यात आले. यातही महापालिकेचेच नुकसान झाले. योजनेचा सांभाळ दहा वर्षे कंत्राटदारानेच करावा असे निविदेत म्हटले आहे. त्यासाठी २०१३ मध्येच दर का निश्चित करण्यात आले नाहीत. आता या कामासाठी मनपा स्वत:च्या खिशातील ६४ कोटी रुपये खर्च करीत आहे. योजनेतील भ्रष्टाचारावर उद्या बैठकीत सविस्तर चर्चा होणारआहे.