औरंगाबाद : आगामी बहुचर्चित ‘गुलाबी’ चित्रपटातील अभिनेते सचिन खेडेकर व टीमशी दिलखुलास संवाद साधण्याची संधी सखी मंच सदस्यांना आज दुपारी तीन वाजता मिळणार आहे. या संवादासह सुखकर्ता स्पर्धाही आयोजित करण्यात आली असून त्याच्या संत तुकाराम नाट्यगृह (सिडको नाट्यगृह) येथे आयोजित या स्पर्धेसाठी अर्धा तास अगोदर उपस्थित राहणे गरजेचे आहे. कलाकुसर, नक्षीकाम व आकर्षक सजावटीची हौस असणाऱ्या सखींसाठी सुखकर्ता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सुखकर्त्याचे स्वागत करत सणावाराला सजावटीचे कोंदण बहाल करणाऱ्या महिलांना लोकमत सखी मंच आयोजित ‘सुखकर्ता-उत्सव महाराष्ट्राचा’च्या माध्यमातून आपली कला सादर करता येईल. मोदक बनवा स्पर्धा व रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून विविध बक्षिसे मिळवण्याची संधीही यातून उपलब्ध होणार आहे. रांगोळीसाठी लागणारे सर्व साहित्य महिलांनी घरूनच आणावे. मोदक स्पर्धेसाठी मोदक घरूनच बनवून आणणे आवश्यक आहे. सजावट स्पर्धेच्या ठिकाणी करता येईल. डेकोर झोन यांनी बक्षिसांचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे. स्पर्धेच्या वेळेत बदलसुखकर्ता स्पर्धेच्या बदललेल्या वेळांची स्पर्धकांनी नोंद घ्यावी. रांगोळी स्पर्धा दुपारी दीड वाजता तर मोदक सजावट व श्लोक पठण स्पर्धा दुपारी अडीच वाजता होणार आहे.‘‘गुलाबी’’ टीमशी गप्पा दुपारी तीन वाजता रंगणार आहेत.
सखी मंचच्या सदस्यांसाठी सुखकर्ता स्पर्धेचे आयोजन
By admin | Updated: September 5, 2014 00:53 IST