शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

वैयक्तिक मान्यतेचा प्रस्ताव नाकारणारा शिक्षणाधिकाºयांचा आदेश रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:36 IST

शिक्षणसेवकांच्या वैयक्तिक मान्यतेचा प्रस्ताव नाकारणारा शिक्षणाधिकाºयांचा आदेश औरंगाबाद खंडपीठाने रद्द केला.़ याचिकाकर्त्याच्या पदाला वैयक्तिक मान्यता आहे, असे समजून त्या पदाला असलेले सर्व फायदे देण्याचे आदेशदेखील न्या़ एस़ व्ही़ गंगापूरवाला आणि न्या़ मंगेश पाटील यांच्या खंडपीठाने दिले़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शिक्षणसेवकांच्या वैयक्तिक मान्यतेचा प्रस्ताव नाकारणारा शिक्षणाधिकाºयांचा आदेश औरंगाबाद खंडपीठाने रद्द केला.़ याचिकाकर्त्याच्या पदाला वैयक्तिक मान्यता आहे, असे समजून त्या पदाला असलेले सर्व फायदे देण्याचे आदेशदेखील न्या़ एस़ व्ही़ गंगापूरवाला आणि न्या़ मंगेश पाटील यांच्या खंडपीठाने दिले़नांदेड जिल्ह्यातील उमरदरी येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळांतर्गत नरसिंह विद्यालय सिडको येथे रिक्त पदावर याचिकाकर्ते गंगाराम तुकाराम बस्वदे हे २०१३ पासून शिक्षणसेवक म्हणून कार्यरत आहेत. संस्थेने रीतसर जाहिरात देऊन बस्वदे यांना नियुक्ती दिली होती़ दरम्यान, बस्वदे यांची नियुक्ती ही मान्यता बंदी काळातील असल्याचे कारण दाखवून त्रिसदस्यीय समितीने याचिकाकर्त्यांसह एकूण १२९ प्रकरणांची चौकशी केली़ चौकशीचा अहवाल विभागीय उपसंचालक यांच्याकडे सादर करून याचिकाकर्त्यांसह इतर १२ शिक्षकांची वैयक्तिक मान्यता अयोग्य ठरवून रद्द करण्याची शिफारस करण्यात आली.़ त्यानुसार विभागीय उपसंचालकांनी गंगाराम बस्वदे यांची वैयक्तिक मान्यता रद्द केली़ या नाराजीने बस्वदे यांनी अ‍ॅड. विलास पानपट्टे यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. संस्थेमध्ये एका शिक्षकाचा मृत्यू झाल्यामुळे बिंदूनियमावलीनुसार एक पद खुल्या प्रवर्गासाठी रिक्त झाले होते.़ पदभरतीसाठी पूर्वपरवानगी मागितल्यानंतर २५ नोव्हेंबर २०१३ रोजी बस्वदे यांची शिक्षणसेवक म्हणून तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आल्याचे अ‍ॅड. पानपट्टे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले़दरम्यान, यापूर्वी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने शिक्षणाधिकाºयांचे आदेश रद्द करून फेरसुनावणीसाठी प्रकरण वर्ग केले़ त्यानंतर याचिकाकर्त्याच्या वैयक्तिक मान्यतेचा आदेश कायम ठेवला. मात्र, पगार देण्यास टाळाटाळ केली़ याचिकाकर्त्याने पगाराची मागणी केली असता चुकीच्या पद्धतीने चौकशी समितीचा आधार घेऊन त्यांची वैयक्तिक मान्यता रद्द केली़ मात्र एकदा दिलेली वैयक्तिक मान्यता पुन्हा त्याच शिक्षणाधिकाºयांना रद्द करता येत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले़ तसेच याचिकाकर्त्याने आजपर्यंत चार वर्षे सेवा पूर्ण केल्याने महाराष्ट्र खाजगी सेवा-शर्ती अधिनियमातील तरतुदीनुसार सर्व लाभ मिळण्यास पात्र असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले़ सुनावणीअंती खंडपीठाने याचिका मंजूर करून शिक्षणाधिकाºयांचा आदेश रद्द करून वरीलप्रमाणे आदेश दिला.़ याचिकाकर्त्याच्या वतीने अ‍ॅड. विलास पानपट्टे यांनी बाजू मांडली. तर शासनाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील पी़ एस़ पाटील यांनी काम पाहिले.