शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

जास्त रकमेवर दहा टक्के दराने व्याज देण्याचा आदेश

By admin | Updated: November 14, 2015 00:52 IST

औरंगाबाद : म्हाडाने ठरविलेल्या किमतीपेक्षा (म्हणजे १३ लाख ३४ हजार रुपयांपेक्षा) तक्रारदार किरण अरुण शिरूरकर यांच्याकडून गैरअर्जदार जास्त रकमेवर दहा टक्के दराने व्याज देण्याचा आदेश

औरंगाबाद : म्हाडाने ठरविलेल्या किमतीपेक्षा (म्हणजे १३ लाख ३४ हजार रुपयांपेक्षा) तक्रारदार किरण अरुण शिरूरकर यांच्याकडून गैरअर्जदार औरंगाबाद हाऊसिंग अ‍ॅण्ड एरिया डेव्हलपमेंट यांनी जादा घेतलेल्या रकमेवर वार्षिक १० टक्के व्याजदराने बँक डीडीने आदेशापासून ३० दिवसांच्या आत रक्कम परत करण्याचा आदेश औरंगाबाद जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे सदस्य किरण ठोले यांनी नुकताच दिला आहे. तसेच तक्रारदारास गाळ्याचा ताबा दोन वर्षांत दिला नाही. गाळा ताब्यात देण्यास दोन वर्षांपेक्षा जास्त लागलेल्या कालावधीसाठी म्हाडाने गाळ्याच्या किमतीवर (म्हणजे १३ लाख ३४ हजार रुपयांवर) वार्षिक १० टक्के दराने बँक डीडीने आदेशापासून ३० दिवसांच्या आत व्याज द्यावे, असेही आदेशात म्हटले आहे. म्हाडाने २२ सप्टेंबर २००७ रोजी काही अटी टाकून तीन प्रकारचे गाळे विक्रीसाठी वृत्तपत्रात जाहिरात दिली होती. तक्रारदार किरण शिरूरकर यांनी त्यापैकी उच्च उत्पन्न गटातील गारखेडा येथील २६ गाळ्यांपैकी एका गाळ्यासाठी अर्ज केला होता. जाहिरातीत दर्शविल्याप्रमाणे गाळ्याची किंमत १३ लाख ३४ हजार रुपये इतकी होती. तक्रारदाराने गाळ्याच्या किमतीपैकी १० टक्के म्हणजे १ लाख ३३ हजार ४०० रुपये अर्जासोबत भरले होते. उर्वरित रक्कम बांधकाम सुरू झाल्यानंतर प्रत्येकी २ लाख १०० च्या त्रैमासिक हप्त्याने सहा हप्त्यांत म्हणजे बांधकाम सुरू झाल्यापासून दीड वर्षात रक्कम भरावयाची होती.जाहिरातीच्या तारखेपासून दोन वर्षांच्या आत गैरअर्जदाराने तक्रारदारास गाळा ताब्यात द्यावयाचा होता. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार गाळा ताब्यात देण्यासाठी सहा वर्षे लागली. सहा वर्षांत गाळ्याची किंमत दोन वेळा एकूण ९ लाख ४३ हजार ८७० रुपयांनी वाढली. तक्रारदाराने गाळा खरेदी करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतले होते. त्या कर्जाच्या परतफेडीचे हप्तेसुद्धा सुरू झाले होते. गाळा ताब्यात न मिळाल्यामुळे इतरत्र राहण्याचा खर्च व बँकेचे हप्ते यांचा बोजा तक्रारदारास सहन करावा लागला.