शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला न बोलावल्याने विरोधी लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:07 IST

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीला न बोलावल्याने भाजप आणि ‘एमआयएम’च्या लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी आहे. ...

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीला न बोलावल्याने भाजप आणि ‘एमआयएम’च्या लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी आहे.

जिल्ह्यात आमदार हरिभाऊ बागडे, आ. अतुल सावे, आ. प्रशांत बंब हे भाजपकडून विधानसभा सदस्य आहेत, तर डॉ. भागवत कराड हे राज्यसभा सदस्य आहेत. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे आहेत. यांपैकी कुणालाही मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचे निमंत्रण नव्हते; तर दुसरीकडे पालकमंत्री सुभाष देसाई, रोहयो मंत्री संदिपान भूमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, आमदार अंबादास दानवे, आ. संजय शिरसाट, आ. उदयसिंह राजपूत, आ. रमेश बोरनारे, माजी खासदार चंद्रकांत खैरे या शिवसेनेच्या नेत्यांची उपस्थिती होती. याशिवाय विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, आदींची उपस्थिती होती.

यासंदर्भात एमआयएमचे खा. जलील म्हणाले की, लोकसभेचे अधिवेशन सुरू असल्यामुळे मी दिल्लीत आहे. परंतु मुख्यमंत्री जिल्ह्याच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी येणार असल्याचे माहीत नव्हते. तसे निमंत्रणही नव्हते. तर भाजपचे आमदार अतुल सावे म्हणाले की, त्यांना त्यांच्या पक्षाचे लोकप्रतिनिधी चालले, परंतु भाजपकडून काही भीती असेल म्हणून त्यांनी बोलावले नाही.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याबाबत सांगितले की, ही बैठक फक्त अधिकाऱ्यांची होती. मुख्यमंत्र्यांच्या तशाच सूचना होत्या. कुणालाही निमंत्रित करण्याचा मुद्दाच नव्हता. मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचे लोकप्रतिनिधी मनानेच आले, त्यांना आम्ही रोखू शकलो नाही. बैठकीत आलेले लोकप्रतिनिधी, राज्यमंत्री हे काहीही बोलले नाहीत. अधिकाऱ्यांनीच सादरीकरण केले.