औरंगाबाद : ‘जुळून येती रेशीमगाठी’ या टीव्हीवरील प्रेक्षकप्रिय मालिकेतील सून मेघना व तिची सासू माई यांना भेटण्याची संधी लोकमत सखी मंचने महिलांसाठी उपलब्ध करून दिली आहे. लोकमत सखी मंच व लालचंद मंगलदास सोनी ज्वेलर्स प्रस्तुत ‘सासू- सून संमेलन’ स्पर्धेमुळे ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ तील सून मेघना (प्राजक्ता माळी) आणि सासू माई (सुकन्या कुलकर्णी) यांची प्रमुख उपस्थिती असलेली ही स्पर्धा २३ जून रोजी दुपारी ३ वाजता संत तुकाराम नाट्यगृहात (एन-५) होईल. विजेत्या स्पर्धकांना या लोकप्रिय सासू व सुनेच्या हस्ते पारितोषिके जिंकण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेत स्वपरिचय फेरी व एक मिनिट गेम शो घेण्यात येणार आहे. सखी मंचच्या सदस्यांनी सखी मंचचे ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. लहान मुलांना सोबत आणू नये. या स्पर्धेचे प्रायोजकत्व लालचंद मंगलदास सोनी ज्वेलर्सने स्वीकारले आहे.सासू- सून संमेलनात भाग घेण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. नावनोंदणीसाठी ९८५०४०६०१७ या क्रमांकावर सकाळी ११ ते ५ या वेळेत संपर्क साधावा. नावनोंदणीचा शेवटचा दिवस २१ जून आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन लोकमत सखी मंचतर्फे करण्यात आले आहे.सहभागीहोण्यासाठी नियमस्वपरिचय फेरीमध्ये सासूने सुनेचा व सुनेने सासूचा परिचय प्रत्येकी १ मिनिटात करून द्यावा.स्वपरिचय फेरीसाठी जोडीने मॅचिंग वेशभूषा करावी.एक मिनिट गेम शो फेरीमध्ये दोघींना मिळून दिलेला गेम खेळायचा आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
‘जुळून येती रेशीमगाठी’च्या सासू- सुनेला भेटण्याची संधी
By admin | Updated: June 20, 2014 01:10 IST