शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘सुन रहा है’फेम अंकितला ऐकण्याची संधी

By admin | Updated: October 5, 2014 00:50 IST

औरंगाबाद : ‘लोकमत’ आणि प्रोझोन मॉलच्या संयुक्त विद्यमाने गायक अंकित तिवारीला ऐकण्याची संधी दि.८ आॅक्टोबर रोजी प्रोझोन मॉल येथे मिळणार आहे.

औरंगाबाद : प्रोझोन मॉलच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त ‘लोकमत’ आणि प्रोझोन मॉलच्या संयुक्त विद्यमाने ‘सुन रहा है ना तू’ आणि ‘तेरी गलियाँ’ गाण्याचा गायक अंकित तिवारीला ऐकण्याची संधी बुधवार, दि.८ आॅक्टोबर रोजी प्रोझोन मॉल येथे मिळणार आहे. या कार्यक्रमाचे मोफत पास लोकमत सखी मंच, युवा नेक्स्ट आणि कॅम्पस क्लबच्या सदस्यांना ५ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान लोकमत भवन येथे मिळणार आहेत. पास मर्यादित उपलब्ध असल्यामुळे प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य या तत्त्वावर पास वाटप करण्यात येणार आहेत. एका पासवर एका सदस्याला प्रवेश देण्यात येणार आहे. सदस्यांनी सोबत ओळखपत्र आणणे आवश्यक आहे.ग्राहकांमुळेच आम्ही यशस्वीप्रोझोनच्या वर्धापन दिनानिमित्त मॉलचे संचालक अनिल इरावने यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, स्मार्ट सिटी म्हणून ज्या शहराची ओळख होत आहे, त्यामध्ये औरंगाबादचा समावेश असल्यामुळे शहरात नवीन काम करण्याची इच्छा होती. त्यामुळे शहराची प्रोझॉन मॉल बांधण्यासाठी निवड केली. मराठवाड्यातील ग्राहकांच्या सहकार्यामुळे आम्ही यशस्वी झालो, राज्यातील मोठ्या मॉलपैकी एक असलेल्या प्रोझोन मॉलला ८ आॅक्टोबर रोजी चार वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या चार वर्षांपासून आम्ही मराठवाड्यातील शहरी आणि ग्रामीण भागामधील ग्राहकांना यशस्वी सेवा देत आहोत. ग्राहकांना एकाच ठिकाणी सर्व काही खरेदी करण्याची संधी प्रथम मिळवून दिली. ग्रामीण भागातील ग्राहक शहरात आल्यानंतर प्रोझोनला नक्कीच भेट देतो. सर्व वर्गांमधील ग्राहकांना विविध वस्तू खरेदी करण्याची संधी येथे उपलब्ध करण्यात आलेली आहे.मॉलमध्ये विविध क्षेत्रांतील विविध नामांकित कंपन्यांचे ब्रँड आहेत. सरल बाजारमध्ये १९० दुकाने आणि प्रोझोन ट्रेड सेंटर लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ग्राहकांना खरेदीसोबत मनोरंजन व्हावे यासाठी आम्ही विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतो. मॉलच्या माध्यमातून दोन हजार जणांना रोजगार मिळाला आहे.महिन्याला ६ लाख ग्राहकांची भेटसुरक्षा, सेवा, गुणवत्ता आणि पार्किंगची प्रशस्त व्यवस्था असल्यामुळे संपूर्ण मराठवाड्यातून ग्राहक येथे येतात. प्रोझोन मॉलमध्ये महिन्याला सहा लाख ग्राहक भेट देत आहेत.या कार्यक्रमाचे मोफत पास लोकमत सखी मंच, युवा नेक्स्ट आणि कॅम्पस क्लबच्या सदस्यांना ५ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान लोकमत भवन येथे मिळणार आहेत.