शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

माध्यम क्षेत्रात तरुणांना संधी

By admin | Updated: September 3, 2014 00:30 IST

माहितीच्या युगात माध्यमांचे महत्त्व आणखी वाढले आहे. या क्षेत्रात रोजगाराच्या पुरक संधी उपलब्ध असल्याचे मत माजी कुलगुरु डॉ़ सुधीर गव्हाणे यांनी व्यक्त केले़

नांदेड: तंत्रज्ञानाच्या विकासामुळे जगण्याचे आयाम पुरते बदलले आहेत़ माहितीच्या युगात माध्यमांचे महत्त्व आणखी वाढले आहे. या क्षेत्रात रोजगाराच्या पुरक संधी उपलब्ध असल्याचे मत माजी कुलगुरु डॉ़ सुधीर गव्हाणे यांनी व्यक्त केले़स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माध्यमशास्त्र संकुलात ‘माध्यम क्षेत्रातील विविध संधी’ या विषयावर मंगळवारी व्याख्यान झाले़ डॉ़ गव्हाणे म्हणाले, आजचे युग नाविण्यपूर्ण कल्पनांचे आहे़ नवमाध्यमांमुळे भविष्यात मनोरंजन व माध्यम क्षेत्रात रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध होणार आहेत़ त्याचा वेध घेवून युवकांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे़ युवक आणि माध्यमांचा अतुट संबंध आहे़ भारत ही मोठी बाजारपेठ असल्याने जगभरातील विविध कंपन्या येथे गुंतवणूक करत आहेत़ मनोरंजन व माध्यम इंडस्ट्रीज ही स्वतंत्र आर्थिक क्षेत्र बनले आहे़ जिथे गुंतवणूक जास्त असते तेथे संधीही आपोआपच वाढतात़ या क्षेत्रातील स्पर्धा लक्षात घेता माध्यम क्षेत्रात रोजगार उपलब्ध करुन देणारा भारत जगातील प्रथम क्रमांकाचा देश बनेल़ माध्यमांचे लोकशाहीकरण होत आहे़ सिटीझन जर्नालिझमचे महत्त्व हे याचेच द्योतक होय़ तंत्रज्ञान दिवसेंदिवस अधिक प्रगत होत असून त्यावर कोणाचेही नियंत्रण ठेवणे शक्य नाही़ देशातील ८३ टक्के विद्यार्थी उच्च- शिक्षित आहेत़ तरीही त्यांना म्हणावा त्या प्रमाणात रोजगार मिळत नाही़ चाकोरीबद्ध शिक्षणातून बाहेर पडून विद्यार्थ्यांनी व्यवसायपूरक शिक्षण आत्मसात करणे गरजेचे आहे़ असे झाले तरच योग्य दिशा मिळून रोजगार उपलब्ध होईल़ परिणामी देशाची आर्थिक स्थिती आपोआपच सुधारेल़ निसर्गाने आपल्या अकाऊंटवर खूपकाही टाकले आहे़ मात्र त्याचा वापर कशाप्रकारे करायचा यावर सर्व अवलंबून आहे़ अध्यक्षस्थानी संचालक डॉ़ दीपक शिंदे होते़ प्राचार्या डॉ़ रेखा शेळके, अनिकेत कुलकर्णी, चारुलता रोजेकर, नरेश दंडवते, प्रा़ डॉ़ राजेंद्र गोणारकर, प्रा़ सचिन नरंगले, डॉ़ कैलाश यादव, डॉ़ संपत पिंपळे, प्रा़ संदीप नरडेले यांची उपस्थिती होती़ सूत्रसंचालन गजानन अंबोरे यांनी केले़(प्रतिनिधी)