औरंगाबाद : आपण ब्युटी पार्लरचा स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक आहात का, या प्रश्नाचे उत्तर हो असेल तर करिअरच्या दृष्टीने सकारात्मक विचार करणाऱ्या महिलांनो, इकडे लक्ष द्या. लोकमत सखी मंचने खास आपल्यासाठी ‘करिअर इन ब्युटी इंडस्ट्री’ या कार्यशाळेचे २४ जून रोजी आयोजन केले आहे. स्वत:चे ब्युटी पार्लर व्यवसाय सुरू करण्यासाठीचे प्रशिक्षण शुक्रवारी देण्यात येणार आहे. यात पार्लर व्यवस्थापन, केशरचना व मेकअपचे प्रात्यक्षिक, शासकीय योजना व वित्तपुरवठा इ.ची सविस्तर माहिती देण्यात येईल. लोकमत भवन येथील लोकमत हॉल येथे सकाळी ११ वाजता कार्यशाळेला सुरुवात होणार आहे. सखी मंच सदस्यांसाठी प्रवेश मोफत राहील. इतर महिलांसाठी ५०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. या कार्यशाळेचे नॉलेज पार्टनर हर्षा एन. संजय हे आहेत. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. नावनोंदणीसाठी ९८५०४०६०१७ या क्रमांकावर नाव व सखी मंच ओळखपत्र नंबर एसएमएस करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सौंदर्यक्षेत्रात चांगल्या करिअरची संधी
By admin | Updated: June 22, 2016 00:55 IST