शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

‘ओपिनियन मेकर’ उमेदवारांची वानवा!

By admin | Updated: November 4, 2016 00:25 IST

जालना अभ्यासू आणि शहराच्या विकासाची जाण असलेल्या उमेदवारांची सद्यस्थितीत सर्वच पक्षांत वानवा असल्याचे चित्र त्या त्या पक्षांच्या उमेदवारांच्या यादीवरुन दिसून येते.

राजेश भिसे जालनानगर परिषद हा गत काही वर्षांपासून आखाडा बनला असून, अभ्यासू आणि शहराच्या विकासाची जाण असलेल्या उमेदवारांची सद्यस्थितीत सर्वच पक्षांत वानवा असल्याचे चित्र त्या त्या पक्षांच्या उमेदवारांच्या यादीवरुन दिसून येते. एकूणच ‘मसल आणि मनी पॉवर’ असलेला उमेदवार निवड प्रक्रियेत अधिक प्रभावी ठरल्याचे दिसून येत आहे.जालना नगर परिषद अ दर्जाची पालिका. मात्र, गत काही वर्षांत जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या या नगर परिषदेत अभ्यासू नेतृत्व आणि नगरसेवकांची संख्या कमी होत गेली. मुद्दयाची भाषा गुद्दयावर गेल्याचे पालिकेच्या अनेक सभांवरुन स्पष्ट होते. अशा प्रकारांमुळे अभ्यासू आणि प्रभावी नेतृत्व असलेल्या व्यक्तींनी पालिकेत नगरसेवकाच्या रुपाने जाणे टाळले. त्यामुळे नगर परिषद हा आखाडाच बनल्याचे चित्र गत काही दिवसांत दिसून आले आहे. अर्थकारणातून सत्ताकारण आणि सत्ताकारणातून अर्थकारण हेच सूत्र गत काही वर्षांत राजकारणात रुढ झाले आहे. त्यामुळे कोणतीही निवडणूक लढविणे हे आर्थिकदृष्ट्या सोपे राहिलेले नाही. परिणामी डॉक्टर्स, इंजिनिअर्स, वकील यासारख्या सामाजिक प्रतिष्ठा लाभलेल्या व्यक्तींनी निवडणूक न लढविणेच पसंत केले आहे. जनाधार नसलेले पण ‘मनी आणि मसल पॉवर’ असलेल्या व्यक्तींचा पालिकेत शिरकाव झाला. खिलाडूवृत्तीने कोणत्याही विषयावर सर्वंकष चर्चा झाल्याचे पालिका सभांत अनेक दिवसांपासून दिसून आले नाही. वैचारिक मतभेद असावेत मात्र विकास आणि जनहिताच्या मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले तर शहराचा सर्वांगीन होण्यास मदतच होते. पण अशी स्थिती अपवादात्मक परिस्थिती वगळता जालनेकरांना कधी अनुभवास आली नाही. किती नगरसेवकांना पालिका प्रशासनाचे नियम माहित आहेत. पाच वर्षांत किती नगरसेवकांनी चर्चेत सहभाग नोंदवला वा विकासाच्या मुद्द्यावर आपले परखड मत व्यक्त केले. हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. एकूणच नगर परिषदेच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांकडे अभ्यासू उमेदवारांची वानवा असल्याचे चित्र आहे. विविध विषयांचा अभ्यास असलेले उमेदवार सध्या तरी रिंगणात नसल्याने आगामी काळात पालिकेचा ‘आखाडा’ कोणत्या मुद्द्यांवर गाजणार हे काळच ठरवेल.