शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
3
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
4
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
5
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
6
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
7
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
8
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
9
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
10
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
11
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
12
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
13
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
14
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
15
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
16
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
17
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
18
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?
19
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
20
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)

अवघी शैक्षणिक नगरी एकाच छताखाली

By admin | Updated: June 4, 2014 01:34 IST

औरंगाबाद :खास आपल्यासाठी ‘लोकमत अस्पायर एज्युकेशन फेअर’चे आयोजन करण्यात आले आहे.

 औरंगाबाद : आपल्या पाल्याने कोणता कोर्स करावा, दर्जेदार शिक्षण देणारी संस्था कोणती, सर्व शैक्षणिक संस्थांची माहिती घेण्यासाठी किती फिरावे लागणार, वर्षाला किती फी भरावी लागेल, अनुदान मिळेल काय, असे एक ना अनेक प्रश्न सध्या पालकांना भंडावून सोडत असतील. मात्र, आता आपल्या पाल्याच्या करिअरची चिंता करणे सोडा. कारण, खास आपल्यासाठी ‘लोकमत अस्पायर एज्युकेशन फेअर’चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने सर्व नामांकित शैक्षणिक संस्थांची इत्थंभूत माहिती एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी दिशादर्शक ठरणारे हे प्रदर्शन म्हणजे जणू शैक्षणिक कुंभमेळाच आहे. या उपक्रमाद्वारे व्यावसायिकांनाही हजारो विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचता येणार आहे. शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेणार्‍या ‘लोकमत समूहा’तर्फे यंदाही अस्पायर एज्युकेशन फेअर; अर्थात भव्य शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन ६ ते ८ जूनदरम्यान जालना रोडवरील सेन्ट फ्रान्सिस स्कूलच्या मैदानावर होणार आहे. पालक असो वा पाल्य दोघांच्याही मनात करिअरसाठीच्या शिक्षणाविषयीच्या अनेक शंका, प्रश्न असतात. त्यांचे निराकरण या प्रदर्शनात होईल. शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ या प्रदर्शनात मार्गदर्शन करतील. याशिवाय शैक्षणिक क्षेत्रातील महाविद्यालये, शाळा, मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्टचरपासून फॅशन, ग्राफिक्स, इंटिरियर डिझाईनपर्यंत व रिटेल, आयटीआय, एव्हिएशनपासून मीडिया, अ‍ॅनिमेशन, गेमिंगपर्यंत तसेच विविध विद्यापीठे, प्रोफेशनल क्लासेस, आयटीआय, हॉटेल मॅनेजमेंट, फॉरेन लँग्वेजेस, पॉलिटेक्निकल, स्पोकन इंग्लिश, लॉ कॉलेज, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, कॅपिटल मार्केट या सर्व इन्स्टिट्यूट प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. एकाच ठिकाणी शैक्षणिक माहितीचा खजिना उपलब्ध होणार असल्याने ग्राहकांचा वेळ व पैसा वाचणार आहे. व्यवसायवाढीसाठी हे प्रदर्शन म्हणजे सुवर्ण संधी ठरणार आहे. कारण, एकाच छताखाली हजारो विद्यार्थी व पालकांपर्यंत आपल्या शैक्षणिक संस्थेची माहिती पोहोचविता येणार आहे. प्रत्येकाशी संवाद साधून आपल्या उपक्रमाची माहिती देता येईल. नवा वर्ग आपल्या संस्थेशी जोडला जाईल. मोजकेच स्टॉल शिल्लक असल्याने शैक्षणिक क्षेत्रातील व्यावसायिकांनी आजच आपला स्टॉल बुक करावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९८८११९६६७० या नंबरवर संपर्क साधावा. या फेअरसाठी नारायणा इन्स्टिट्यूट हे प्रायोजक असून नितम (एनआयटीएचएम) हे सह प्रायोजक आहेत. १२ जिल्ह्यांत भरणार प्रदर्शन ‘लोकमत अस्पायर एज्युकेशन फेअर-२०१४’ हे राज्यस्तरीय प्रदर्शन १२ जिल्ह्यांमध्ये भरविण्यात येणार आहे. यात औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, लातूर, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूरचा समावेश आहे. भेटवस्तू देणार प्रदर्शनाला भेट देणार्‍यांपैकी एका भाग्यवंताला दर तासाला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. नारायणा आयआयटी अँड पीएमटी अकॅडमी. ,संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटी, कोपरगाव. ,सूर्यदत्ता ग्रुप इन्स्टिट्यूट, पुणे. ,द युनिक अकॅडमी, पुणे. ,सिंहगड इन्स्टिट्यूट, पुणे. ,विंझडम एज्युकेअर प्रा.लि. ,एनआयटीएचएम, हैदराबाद. , देवगिरी इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट. , आयएनआयएफडी अकॅडमी. , जे.के. जाधव ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन. , डॉ. वारेज् करिअर अकॅडमी. ,ए.एस.एम. ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट, पुणे. , सृजन इन्स्टिट्यूट आॅफ गेमिंग, मल्टिमीडिया अँड अ‍ॅनिमेशन. ,औरंगाबाद चॅप्टर आॅफ इन्स्टिट्यूट आॅफ कंपनी सेक्रेटरी आॅफ इंडिया. , ब्युओ माँड कॉलेज आॅफ फॅशन. ,चंद्रलोप कॉलेज आॅफ फायर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट. ,छत्रपती शाहू कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग. ,धनेश्वरी शैक्षणिक संकुल. ,इंडस वर्ल्ड स्कूल. ,हायटेक अँड सावित्रीबाई फुले वूमन्स इंजिनिअरिंग कॉलेज. ,फ्रेमबॉक्स अ‍ॅनिमेशन अँड व्हिज्युअल इफेक्टस्. ,कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट. ,डीकेएमएम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज. ,सीएनटीएस कॉलेज आॅफ आयटी मॅनेजमेंट. ,पीईएस कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग. ,विद्यालंकार. ,डिपार्टमेंट आॅफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम. (डॉ. बा.आं.म. विद्यापीठ) ,डॉ. डी.वाय. पाटील एज्युकेशनल कॉम्प्लेक्स, आकुर्डी, पुणे. ,रँकर्स पॉइंट. ,महात्मा गांधी मिशन. ,अ‍ॅमिटी ग्लोबल बिझनेस स्कूल, पुणे. ,आयटी फॅक्ट अ‍ॅडव्हान्स कॉम्प्युटर एज्युकेशन. ,इन्स्टिट्यूट आॅफ एअर क्रॉफ्ट मेंटनन्स इंजिनिअरिंग. ,आयसीईईएम. , स्मार्ट, पुणे. , मिडास, पुणे. , हॉरिझन अकॅडमी.