शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

एकच विहीर भागवतेय पारडगावकरांची तहान

By admin | Updated: August 13, 2014 00:49 IST

पारडगाव : घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथे १० हजार लोकसंख्या आहे. गावापासून दीड कि़मी. अंतरावर तलावाच्या शेजारी गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी दोन

पारडगाव : घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथे १० हजार लोकसंख्या आहे. गावापासून दीड कि़मी. अंतरावर तलावाच्या शेजारी गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी दोन विहिरी आहेत. या विहिरीवर वीजपुरवठ्यासाठी स्वतंत्र ट्रान्सफार्मरही आहे. परंतु यापैकी एकाच विहिरीवरून गावाला पाणी पुरवठा होतो. यातही जीर्ण जलवाहिनी व जलकुंभाला लागलेली गळती यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.पाणीपुरवठ्याच्या विहिरीपासून दीड कि़मी. पाईपलाईन असून ही पाईपलाईन पाच ते सहा जागेवर फुटलेली आहे. त्यामुळे जागोजागी पाण्याचे डबके साचते. गावात दोन जलकुंभ आहेत. एक नवीन तर दुसरा ४० वर्षापूर्वीचा. सध्या जुन्या जलकुंभातून गावाला पाणी पुरवठा करण्यात येतो. या जलकुंभाची अवस्था बिकट झाली आहे. पाईपलाईनद्वारे आलेले पाणी लगेच गावात सोडले तर ठिक नाहीतर या जलकुंभात पाण्याचा थेंबही राहात नाही, अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे जेव्हा नळाद्वारे पाणी सोडायचे तेव्हा जलकुंभात पाणी सोडले जाते. रात्री जलकुंभ भरून सकाळी पाणी सोडायचे झाल्यास टाकीत पाणीच राहात नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर या जलकुंभाला गळती लागलेली आहे. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जाते. गावात चार वॉर्ड असताना केवळ दोन वॉर्डातच पाणीपुरवठा होतो. उर्वरित दोन वॉर्डातील ग्रामस्थ पाण्यासाठी भटकंती करीत आहेत.पाणीपुरवठ्यासाठी गावात पाईपलाईन अंथरलेली असूनही अर्ध्या गावाला पाणी मिळत नाही. ग्रामपंचायतचा कारभारही रामभरोसे आहे. सदस्यांना बसण्यास जागा नसल्याने दरवर्षी ग्रामपंचायत बदलावे लागत आहे. बहुतेक कूपनलिका बंद आहेत. शासनाने पाण्यावर लाखो रुपये खर्च करूनही गावाला पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. (वार्ताहर)