शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

केवळ २५ हजार मालमत्तांची वाढ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 23:52 IST

: नगरपालिका क्षेत्रातील मालमत्तांवर नवीन कर आकारणी केले जाणारे वार्षिक फेरमूल्यांकनाचे काम शहरात खाजगी एजन्सीमार्फत सुरू आहे. एजन्सीकडून दीड वर्षांपासून सुरू असलेल्या सर्वेक्षणामध्ये दहा वर्षात केवळ २५ हजार मालमत्तांची वाढ झाल्याचे अधिकारी सांगत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नगरपालिका क्षेत्रातील मालमत्तांवर नवीन कर आकारणी केले जाणारे वार्षिक फेरमूल्यांकनाचे काम शहरात खाजगी एजन्सीमार्फत सुरू आहे. एजन्सीकडून दीड वर्षांपासून सुरू असलेल्या सर्वेक्षणामध्ये दहा वर्षात केवळ २५ हजार मालमत्तांची वाढ झाल्याचे अधिकारी सांगत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.नगरपालिका क्षेत्रातील मालमत्तांवर नवीन कर आकारणीसाठी दर चार वर्षांनी केल्या जाणाºया वार्षिक फेर मूल्यांकनाचे काम शहरात २००७-०८ पासून झालेले नाही. पालिकेकडे सध्या नोंदणीकृत असलेल्या ४५ हजार मालमत्तांवर कर आकारला जातो. गत दहा वर्षात शहराच्या हद्द व बांधकामांचे प्रमाण वाढले तरी पालिकेकडील मालमत्तांचा आकडा ४५ हजारांवरच अडकला आहे. त्यामुळे नगपालिकने मालमत्तांच्या फेरमूल्यांकनाचे काम सध्या नागपूर येथील एका एजन्सीला दिले आहे.सर्वेक्षणासाठी जीआयएस मॅपींगच्या आधारे शहराचे वेगवेगळे झोन तयार करण्यात आले आहेत. एजन्सीच्या २६ कर्मचाºयांमार्फत शहरातील प्रत्येक झोनमधील मालमत्तांच्या प्रत्यक्ष मोजणीचे काम सुरू आहे. यामध्ये मालमत्तेच्या कॉरपेट व बिल्डिअ‍ॅप एरियाचे मोजमाप केले जात असून, छायाचित्रही घेतले जात आहे. शहरातील खुल्या जागांचे मोजपाही केले जात आहे. एका मालमत्तेच्या सर्वेक्षणासाठी एजन्सीला ४८५ रुपये देण्यात येणार आहेत. आतापर्यंत पालिकेने एजन्सीला ४० लाख रुपये दिल्याचे सूत्रांनी सांगितले. सदर एजन्सीने दीड वर्षात २५ हजार मालमत्तांचे मूल्यांकन केले असून, संगणकीय नोंद घेण्याचे काम प्रगतीपथावर आहे. दरम्यान, गत काही वर्षात शहरात अनेक नवीन बांधकाम झाली आहेत.तसेच जुन्या बांधकामांमध्ये अनेक फेरबदल करण्यात आले आहेत. त्यामुळे दहा वर्षानंतर होणाºया सर्वेक्षणात केवळ २५ हजार मालमत्ता आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, सर्वेक्षण झालेल्या मालमत्तांच्या प्रारुप याद्या तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. याद्या तयार झाल्यानंतर नगररचना विभागाची परवानगी घेऊन त्यांच्यावर कर आकारला जाईल. जुन्या व नवीन मालमत्तांची संख्या सध्या ७० हजारांपर्यत आहे. यामध्ये काही प्रमाणात वाढ होईल, असे नवीन कर आकारणी विभागाचे नेल्सन कांबळे यांनी सांगितले.