शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

फक्त २़५ लाख लिटर्स

By admin | Updated: May 5, 2016 00:26 IST

चेतन धनुरे ल्ल उदगीर टँकर पुरवठादारांचा मनमौजीपणा, वीजपुरवठा केवळ ८ तास, खड्डेमय रस्ता, टँकर भरण्यास झालेला विलंब़़़ अशा अडचणींना तोंड देत पहिल्या

मडगाव : बाणावली येथे घरमालकांना अंधारात ठेवून एका भाडोत्री म्हणून राहाणार्‍या जोडप्याने मडगाव पालिकेतून एकाच वर्षात दोन महिन्यांच्या फरकाने जन्मदाखला घेतला असून घरमालकच आपले आई-वडील असल्याचे दाखविण्यात आले आहे. यासंबंधी घरमालकाने मडगाव पोलीस स्थानकात तक्रार नोंद केली असल्याची माहिती घरमालकाच्या बहिणीचा मुलगा जासीत फर्नांडिस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. हा सगळा खटाटोप पोर्तुगीज पासपोर्ट मिळविण्यासाठी केल्याचा संशय फर्नांडिस यांनी व्यक्त केला आहे.या वेळी घरमालक पेद्रू आगुस्तीन फर्नांडिस व त्यांची पत्नी मारिया फर्नांडिस उपस्थित होत्या. पेद्रू फर्नांडिस हे बाणावली येथे राहात असून घराच्या मागील बाजूस त्यांनी काही खोल्या कायदेशीररीत्या भाड्याने दिल्या आहेत. याच भाड्याच्या खोलीत गेल्या तीन वर्षांपासून राहाणार्‍या रेणुका शिवाजी तुळशीदास या महिलेने 29 जानेवारी 2016 रोजी नावेली-शिकेटीच्या पत्त्यावर मडगाव पालिकेतून जन्मदाखला घेतला. त्यानंतर याच महिलेने आपले नाव रिटा फर्नांडिस असून व घरमालकच आपले आई-वडील असल्याचे दाखवून त्यांचा जन्मदाखला मिळत नसल्याचे सांगून मडगाव पालिकेतून 7 मार्च 2016 रोजी दुसरा जन्म दाखला घेतला. या दोन्ही दाखल्यांवर जन्मतारीख 9 डिसेंबर 1988 अशी नोंद केली आहे.रिटा फर्नांडिस हे नाव बदलण्यासाठी त्या महिलेने 2012 साली वृत्तपत्रात जाहिरात दिली होती. हे सर्व तिने नियोजनबद्धरीत्या केल्याचे दिसून येत आहे.रेणुकाचा नवरा शिवाजी तुळशीदास यानेही आपले नाव बदलले असून त्याने आरोग्या फर्नांडिस या नावाने जन्मदाखला घेतला आहे. शिवाय वडिलांचे नाव बुढाप्पा फर्नांडिस व आईचे नाव आरोग्यवा आर. नाडकतीन असे नमूद केले आहे. शिवाजी व रेणुका हे जोडपे मूळ बदामी-कर्नाटक येथील असून कोंबडी विक्रीचा व्यवसाय करीत आहे.यासंबंधी फर्नांंडिस यांनी जन्मदाखला मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे जोडण्यात आली याची माहिती प्राप्त करण्यासाठी माहिती हक्क कायद्याखाली माहिती मागविली आहे. रेणुका या महिलेने वाहतूक कार्यालयाकडून वाहन चालवण्याचा परवानाही प्राप्त केला आहे. 15 दिवसांपूर्वी पोलिसांनी येऊन चौकशी केली; परंतु कोणतीच कारवाई केली जात नसल्याचे फर्नांडिस यांनी सांगितले.यासंबंधी कोलवा, मडगाव, सीबीआय, गुन्हा अन्वेषण विभाग, वाहतूक खाते तसेच मडगाव पालिकेलाही तक्रार दिली असल्याचे ते म्हणाले.गोव्यातील कुठल्याही सरकारी कार्यालयात गोवेकरांची कामे लवकर होत नाहीत; परंतु परप्रांतीयांची कामे वेळेवर होतात. त्यामुळे गोवेकर कंटाळून विदेशात नोकरीसाठी जातात. कारण गोव्यात मोठय़ा प्रमाणात अशी भ्रष्टाचाराची प्रकरणे होत आहेत. या भाडोत्री महिलेचा व तिच्या पतीचा कर्नाटक राज्यातही जन्मदाखला असेल, असा संशयही फर्नांंडिस यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)कोट : पालिका मुख्याधिकारी दीपाली नाईक यांचीही त्यांनी भेट घेतली असता नाईक यांनी पालिकेतून जाणूनबुजून ही सर्टिफिकेट दिली गेली नसून दर दिवशी पालिकेतून सुमारे पाचशे ते सातशे सर्टिफिकेट्स दिली जातात. त्यामुळे बोगस कुठली ते ओळखणे कठीण होते. परंतु या जन्मदाखल्यासंबंधी योग्य चौकशी करून बोगस आढळल्यास दोन्ही जन्मदाखले रद्द करण्यात येतील, असे नाईक यांनी सांगितले.ढँ3 : 0305-टअफ-00कॅप्शन: पत्रकार परिषदेत माहिती देताना जासीत फर्नांंडिस. बाजूला घरमालक पेद्रू आगुस्तीन फर्नांंडिस व मारीया फर्नांंडिस. (अरविंद टेंगसे)