औरंगाबाद : समांतर जलवाहिनीच्या योजनेतून फक्त १०० एमएलडी पाणी वाढणार आहे. योजनेच्या करारात ३०० एमएलडी पाणीपुरवठा होणार असल्याचे नमूद आहे; परंतु औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी ही कंपनी तातडीने १०० एमएलडीचा प्लांट फारोळ्यात उभारणार असल्याचे आयुक्त पी.एम. महाजन यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. जुन्या व नवीन योजनांसह २५६ एमएलडी पाणीपुरवठा होईल. करारात ३०० एमएलडीचे प्लांट उभारण्याची तरतूद आहे. या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, समांतरच्या कराराचे मास्टर शहर अभियंता एस.डी. पानझडे आहेत. त्यामुळे करारात काय आहे, याबाबत तेच बोलू शकतील. १९७२ सालच्या ५६ व १९९२ साली बांधण्यात आलेल्या १०० एमएमएलडीच्या दोन्ही योजना समांतर जलवाहिनीनंतरही सुरूच राहतील, असे आयुक्तांच्या माहितीमुळे स्पष्ट होत आहे.
फक्त १०० एमएलडी पाणी वाढणार
By admin | Updated: December 31, 2014 01:07 IST