जालना : गत काही दिवसांपासून कांद्याच्या भाव वाढीने सर्वच ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. एरवी दहा ते पंधर रुपये प्रति किलो मिळणाऱ्या कांद्याने पंधरा दिवसांपासून पन्नाशी गाठली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या जेवणातून कांदा गायब तर झालाच शिवाय बजेटही कोलमडत आहे.जालना बाजापेठेत जिल्ह्यासह नाशिक व नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होते. पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे उत्पादन तर घटलेच शिवाय नाशिक परिसरातील काही व्यापारी साठेबाजी करीत असल्याने कांदाटंचाई निर्माण झाली आहे. परिणामी कांद्याचे भावही वाढत आहेत. जालना बाजारपेठेत आठवड्याला साधारणपणे १०० क्विंटलपेक्षा जास्त आवक होते. मात्र काही दिवसांपासून ही आवक घटत आहे. स्थानिक व्यापारीही याचा फायदा घेत असल्याचे चित्र आहे. परिणामी भाव वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
कांद्याचे झाले वांधे..!
By admin | Updated: August 23, 2015 23:44 IST