शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

एक हजारावर उमेदवारांची दांडी

By admin | Updated: November 25, 2015 23:24 IST

बीड : जिल्हा परिषदेच्या विविध पदभरतीसाठी बुधवारी दोन टप्प्यांत १६ केंद्रांवर परीक्षा प्रक्रिया पार पडली.

बीड : जिल्हा परिषदेच्या विविध पदभरतीसाठी बुधवारी दोन टप्प्यांत १६ केंद्रांवर परीक्षा प्रक्रिया पार पडली. ४ हजार ८७१ पैकी ३ हजार ८४५ जणांनी परीक्षा दिली. सुमारे १ हजार २६ उमेदवारांनी मात्र पाठ फिरवली. जि.प. च्या वतीने आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी व कृषी अधिकारी या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले होते. शहरातील १६ केंद्रांवर सकाळी १० ते ११:३० व दुपारी २ ते ३:३० या वेळेत परीक्षा झाल्या. आरोग्य सेवक महिला या ११० पदांसाठी ३ हजार ९४१ अर्ज होते. ३१६३ जणांनी उपस्थिती लावली तर ७७८ उमेदवार अनुपस्थित राहिल्या. आरोग्य सेवक पुरुष (५० टक्के) या ४ पदांसाठी ११९ अर्ज होते. ४१ जणांनी पाठ फिरवली. केवळ ७८ जणांनी परीक्षा दिली. आरोग्य सेवक पुरुष (४० टक्के) या ३ पदांसाठी ४८२ अर्ज आले त्यापैकी ३७३ जण परीक्षेला हजर होते, १०९ जणांची गैरहजेरी होती. औषध निर्माण अधिकारीपदाच्या एका जागेसाठी १२७ उमेदवारांनी अर्ज भरले. ८३ जण परीक्षेला होते तर ४५ जणांनी पाठ फिरवली. कृषी अधिकाऱ्याच्या एका पदासाठी २०२ उमेदवारांचे अर्ज आले होते. १४९ जणांनी हजेरी लावली तर ५३ जणांनी दांडी मारली. दरम्यान, परीक्षा प्रक्रियेदरम्यान, ठिकठिकाणच्या केंद्रांना पथकांनी भेटी दिल्या. पोलिस बंदोबस्तही तैनात होता.सीईओ नामदेव ननावरे, अतिरिक्त सीईओ धनराज निला, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, नईमोद्दीन कुरेशी, एन. ए. इनामदार आदी अधिकारी ठाण मांडून होते. (प्रतिनिधी)