गेवराई : तालुक्यात निवडणूक विभागाच्या वतीने गेल्या तीन महिन्यांपूर्वी नवीन मतदार व दुरूस्ती अभियान राबवण्यात आले; मात्र यात मतदार ओळखपत्रात फोटो एकाचा, तर नाव दुस-यांचे, तर काहीचा पत्ताच चुकीचा टाकण्यात आल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे .तालुक्यातील १८ वर्ष पूर्ण झालेल्या नवीन मतदारांना आपली नावे मतदार यादीत लावण्यासाठी व काहीची नावे गेल्या वेळेस चुकीची आली आहेत, यात तालुक्यातील ३५५० पुरूषांनी, तर १५५८ महिलांनी आपले नवीन नावे लावून घेतली. त्यांना मतदान कार्डसुद्धा वाटप करण्यात आले. या चुकीच्या कार्डामुळे कोणतेच शासकिय काम होत नसल्याने हे कार्ड नव्याने करून देण्यात यावेत अशी मागणी होत आहे. हे मतदान कार्ड करताना आॅपरेटरकडून तांत्रिक अडचणी आल्याने असे झाले आहे, असे नायब तहसीलदार ए.एन.मोरे म्हणाले. तहसील कार्यालयाच्या या कामामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून, कार्ड दुरूस्त करून देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
मतदानकार्डात फोटो एकाचा, नाव दुसऱ्याचे
By admin | Updated: February 13, 2016 23:52 IST