याविषयी पोलिसांनी सांगितले की, बेरीबाग येथील एका व्यापाऱ्याने त्याच्या घरात गुटख्याचा साठा जमा केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांना मिळाली. यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. इंगोले आणि विशेष पथकाचे फौजदार मारोती खिल्लारे, कर्मचारी राठोड, शिवाजी दांडगे, शिंदे आणि महिला कर्मचारी पवार यांनी रविवारी संशयित घरावर छापा टाकला. तेव्हा घरात साठवून ठेवलेला गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा माल पोलिसांना दिसला. तेथे आरोपी माजीद खान होता. पोलिसानी अन्न निरीक्षक मोहम्मद फरीद अब्दुल रशिद सिद्दिकी यांना पाचारण केले आणि पंचनामा केला. तेव्हा जप्त मालाची किंमत तब्बल एक लाख सहा हजार ९० रुपये असल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपी माजीद खान आणि त्याचा साथीदार हारुण पटेल विरुद्ध गुन्हा नोंदविला. माजिदला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.
हर्सुल परिसरातील बेरीबाग येथून एक लाखाचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:05 IST