शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

एक किलोमीटरच्या अदालत रोडचे वाटोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:30 IST

क्रांतीचौक ते महावीर चौकापर्यंत एक किलोमीटर अंतरातील रस्त्याची खड्ड्यांमुळे पूर्णत: चाळणी झालेली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : क्रांतीचौक ते महावीर चौकापर्यंत एक किलोमीटर अंतरातील रस्त्याची खड्ड्यांमुळे पूर्णत: चाळणी झालेली आहे. साडेसहा कोटी रुपयांची निविदा दीड वर्षापासून मंजूर असतानाही केवळ नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (एनएचएआय) जालना रोडचे रुंदीकरण करणार, या आशेपोटी त्या रस्त्याचे काम पालिका करीत नाही. परिणामी नागरिकांना खड्ड्यांमुळे होणाºया असह्य त्रासांना सामोरे जावे लागत आहे.२४.३३ कोटींचा निधी शासनाने पालिकेला दिला. त्यामध्ये क्रांतीचौक ते महावीर चौक या रस्त्याच्या मजबुतीकरणाचा समावेश करून साडेसहा कोटींचा निधी ठेवण्यात आला. जालना रोडचा महत्त्वाचा भाग असलेला तो १ कि़ मी. चा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नाही. त्यामुळे बांधकाम विभाग जालना रोडची डागडुजी करताना त्या १ कि़ मी. अंतराची डागडुजी करीत नाही. मनपाने दीड वर्षापासून त्या रोडवरील खड्डे भरलेले नाहीत. या पावसाळ्यात उड्डाणपुलासह महावीर चौकापर्यंत पूर्ण रस्ता खराब झाला आहे. एनएचएआयने बीड बायपास, जालना रोडच्या रुंदीकरणाच्या निविदा दिल्ली मुख्यालयाला पाठवून १९ सप्टेंबर रोजी १ वर्ष पूर्ण झाले आहे. त्या निविदांवर काहीही निर्णय होत नाही. उलट ८०० कोटींचा तो प्रकल्प ४०० कोटींवर आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. अशा परिस्थितीत मनपा क्रांतीचौक ते महावीर चौकापर्यंतचा रस्ता दुरु स्त करून घेणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.