शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
2
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
3
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
4
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
5
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
6
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
7
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?
8
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
9
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
10
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
11
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
12
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
13
आज रात्री किती वाजता दिसणार चंद्रग्रहण, कधी असेल ग्रहणाचा स्पर्श, मध्य आणि मोक्षकाळ, जाणून घ्या  
14
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
15
मिनेसोटात हेलिकॉप्टरचा भीषण अपघात, एअरपोर्टजवळ 'आर६६' हेलिकॉप्टर जळून खाक; प्रवाशांचा मृत्यू
16
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
17
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
18
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
19
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
20
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन

ट्रॅव्हल्सखाली चिरडून एक ठार

By admin | Updated: July 27, 2014 01:09 IST

दैठणा : परभणी-गंगाखेड रस्त्यावरील दैठण्यापासून जवळ असलेल्या चुना भट्टीजवळ ट्रॅव्हल्सखाली चिरडून दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना २६ जुलै रोजी सकाळी ७़१५ वाजेच्या सुमारास घडली़

दैठणा : परभणी-गंगाखेड रस्त्यावरील दैठण्यापासून जवळ असलेल्या चुना भट्टीजवळ ट्रॅव्हल्सखाली चिरडून दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना २६ जुलै रोजी सकाळी ७़१५ वाजेच्या सुमारास घडली़या घटनेच्या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी- २६ जुलै रोजी आमावस्या असल्याने गंगाखेड तालुक्यातील धसाडी येथील दीपक बाबूराव शिंदे (वय १९) व त्याचा नातेवाईक मारोती तुकाराम शिंदे (वय १८) हे दोघे एमएच २२ ई-८१४२ या क्रमांकाच्या दुचाकीवरून पोखर्णी येथील नृसिंह मंदिरात दर्शनासाठी गेले होते़दर्शन घेऊन धसाडीकडे परत जात असताना दैठणा गावापासून काही अंतरावर असलेल्या चुनाभट्टीजवळ सायकलला ओव्हरटेक करीत असताना दुचाकीस्वार दोघेही रस्त्यावर पडले़ याच दरम्यान गंगाखेडकडून भरधाव वेगाने एक ट्रॅव्हल्स आली़ या ट्रॅव्हल्सखाली चिरडून दीपक बाबूराव शिंदे याचा जागीच मृत्यू झाला़ तर मारोती तुकाराम शिंदे बालंबाल बचावले़ दरम्यान,ट्रॅव्हल्स चालक घटनेनंतर गाडी घेऊन पसार झाला़ दैठणा पोलिस ठाण्याचे गोविंद लोखंडे, जमादार खळीकर हे घटनास्थळी दाखल झाले़ त्यांनी फोन वरून पोलिस निरीक्षक तरोने यांना घटनेची माहिती दिली़ त्यावरून परभणी येथील नानलपेठ पोलिसांनी ही ट्रव्हल्स ताब्यात घेतली आहे़ सदर ट्रॅव्हल्स खुराणा यांची असल्याचे पोलिसांनी सांगितले़ (वार्ताहर)आपत्कालीन सेवा नावालाच एखाद्या ठिकाणी अपघात झाला तर १०८ हा टोल फ्री क्रमांक डायल केल्यानंतर घटनास्थळी रुग्णवाहिका पाठविण्याची सेवा शासनाने सुरू केली आहे़ परंतु, ही सेवा नावापुरतीच असल्याचे चित्र आहे़या सेवेअंतर्गत दैठणा प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका दिली खरीे़ परंतु, या रुग्णवाहिकेचा काहीच उपयोग होत नाही, असे दिसले़ घटना घडल्यानंतर दैठणा येथील काही युवक मंडळी घटनास्थळी दाखल झाले़ त्यांनी १०८ क्रमांक डायल केला़ मात्र हा क्रमांक सुरूवातीला पुणे येथे जातो, त्या ठिकाणी चौकशी होते़ चौकशीत बराच वेळ निघून जातो़ पुणे येथून जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास माहिती दिली जाते़ या सर्व खटाटोपात अत्यवस्थ असलेल्या रुग्णाला अन्य एका वाहनाने परभणी येथे उपचारासाठी घेवून जावे लागते़ कमीत कमी वेळेत मदत पोहोचविण्यासाठी ही यंत्रणा नेहमी तत्पर असणे गरजेचे आहे़ परंतु, याबाबत गांभीर्याने घेत नसल्याचे दिसते़ त्यामुळे शासनाची आपत्कालीन सेवा ही केवळ नावापुरतीच असल्याचे दिसत आहे़