शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात एक जण ठार

By admin | Updated: November 14, 2015 00:50 IST

परंडा : कुर्डूवाडीहून परंड्याकडे येणाऱ्या जीप व उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर जोराची धडक झाल्याने एका युवकाचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी झाले़

परंडा : कुर्डूवाडीहून परंड्याकडे येणाऱ्या जीप व उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर जोराची धडक झाल्याने एका युवकाचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी झाले़ हा अपघात गुरूवारी रात्रीच्या सुमारास वागेगव्हाण नजीक घडला असून, या प्रकरणी शुक्रवारी रात्रीपर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता़ जखमींवर बार्शी येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पाचपिंपळा येथील ज्ञानेश्वर खैरे (वय-२४), सिध्देश्वर लांडगे (वय-३०), बालाजी खैरे (वय-२२), शशिकांत खैरे (वय-३०), तुकाराम डांगे (वय-२०) हे गुरूवारी दुपारी पाडव्यानिमित्त मोहळ तालुक्यातील नागनाथ वडवळ्याला नागोबाच्या दर्शनासाठी गेले होते़ दर्शन घेवून ते मोहोळ, माढा मार्गे कुर्डूवाडीतून परंड्याकडे येत होते़ रात्रीच्या सुमारास त्यांची जीप वागेगव्हाणनजीक आली असता समोरून येणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टरला जोराची धडक झाली़ या अपघातात जीपमधील ज्ञानेश्वर खैरे हा समोरील काचातून बाहेर फेकला जावून त्याच्या डोक्याला, कपाळावर गंभीर दुखात झाली़ गंभीर जखमी झालेल्या ज्ञानेश्वर खैरे याचा जागीच मृत्यू झाला़ तर वागेगव्हाण येथील ट्रॅक्टरचा चालक वैजिनाथ अभिमान जगताप याचा एक पाय मोडला असून, तोही गंभीर जखमी झाला आहे़ तसेच जीपमधील सिध्देश्वर लांडगे, बालाजी खैरे, शशिकांत खैरे, तुकाराम डोंगे हे जखमी झाले़ जखमींना तत्काळ उपचारासाठी बार्शी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते़ या अपघाताची शुक्रवारी रात्रीपर्यंत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली नव्हती़ (वार्ताहर)