शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

जिसको गले लगा लिया वो दूर हो गया...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:07 IST

किशन तनवाणींना सेनेत एकटे पाडण्याची खेळी गुलमंडीवर पाय ठेवायचा नाही तुम्ही महापालिकेच्या लोकांनी... ही गर्जना परवा सायंकाळी गुलमंडीवर केली ...

किशन तनवाणींना सेनेत एकटे पाडण्याची खेळी

गुलमंडीवर पाय ठेवायचा नाही तुम्ही महापालिकेच्या लोकांनी... ही गर्जना परवा सायंकाळी गुलमंडीवर केली आणि त्याचे पडसाद पार शेंद्र्‌यापासून ते विटखेड्यापर्यंत पोहोचले. जवाहर काॅलनी, उल्कानगरीत तर अक्षरश: ‘इफो इफेक्ट’ होता. आजवरच्या अनुभवावरून आम्हास वाटले की, केवळ या गर्जनेने उभी महानगरपालिका गदागदा हलली असेल. रात्री झोपताना महापालिकेत कशी पळापळ झाली असेल, अशी कल्पना करीत झोपलो.

दुसरा दिवस अघटित घटनांनी उजाडला. गुलमंडीवर बुलडोझर, पोकलेन चालक, ओटे, पत्रे जमीनदोस्त केले आणि नाद नाय करायचा... असे न सांगता बजावत हा ताफा पाडापाड करून परत गेला.

सायंकाळी ५ ते सकाळी १० या १७ तासांत काय घडले? सायंकाळी ५ वाजता मास्क लावण्याच्या मुद्द्‌यावर महापालिकेचे पथक आणि माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांचा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. सेनेचे किशनचंद तनवाणी त्यांच्यासोबत होते. यातूनच गुलमंडीवर पाय ठेवायचा नाही, अशी तंबी दोघांनी महापालिकेच्या पथकाला दिली आणि येथून वर्षभरापूर्वी भाजपमधून शिवसेनेत आलेले किशनचंद तनवाणी यांचे पाय गाळात रुतायला सुरुवात झाली. रात्रभर मोबाईल खणखणले. मुंबईपासून औरंगाबादपर्यंत काही नंबर कायम बिझी राहिले. गुन्हा नोंदवा... असा हिरवा कंदील मिळाला आणि तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यात तनवाणींविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याला राजकीय महत्त्व आहे.

वर्षभरापूर्वी तनवाणींना शिवसेनेत आणले, त्यामागे त्यांना सेनेचे जिल्हाप्रमुख बनवण्याची योजना होती. विधानसभेच्या निवडणुकीत सेनेने जिल्ह्यात अभूतपूर्व यश मिळविले. विधानपरिषदेवर अंबादास दानवे निवडून गेले. आता जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती होण्यात कोणतीही अडचण दिसत नव्हती; पण ‘मातोश्री’वरून इशारा मिळत नव्हता. मध्येच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा घाईघाईत औरंगाबाद दौरा झाला. त्यावेळी तनवाणींनी आपल्या कार्यालयाच्या उद्‌घाटनाची तयारी केली; पण ठाकरे तिकडे फिरकलेच नाहीत आणि येथूनच काही तरी बिघडल्याचे लक्षात यायला लागले आणि आता तर शासकीय कामात अडथळा... या कलमाखाली गुन्हा दाखल झाला.

जिल्हाप्रमुख पदापर्यंत त्यांनी पोहोचू नये यासाठी सेनेतच हालचाली झाल्या आणि परवाचे गुलमंडीवरचे प्रकरण वेगळ्याच वळणावर गेले. या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करायचा की नाही, याचा कायदेशीर खल रात्री उशिरापर्यंत पाडला गेला. शेवटी एका फोनने यावर निर्णय झाला.

दुसऱ्या दिवशी सकाळी गुन्हा दाखल झाला आणि पाठोपाठ गुलमंडीवर महानगरपालिकेचे अतिक्रमण हटाव पथक दाखल झाले. ही कृती प्रशासनाची म्हणावी तर योग्य. कारण प्रशासनाला आव्हान देण्याची हिंमत कोणी करू नये, हा संदेश होता आणि कर्मचाऱ्यांच्या मागे मनपा प्रशासन उभे आहे हे दाखविण्याची वेळ होती. याचा दुसरा संदेश राजकीय आहे, तो हा की, गुलमंडी कोणाची खासगी मालमत्ता नाही. आता हा राजकीय संदेश नेमका कोणी दिला, याचा अंदाज राजकीय तज्ज्ञ घेत आहेत. तनवाणीविरोधकांनी या प्रकरणाचा वापर करत अलगदपणे त्यांना एकटे पाडले.

शहरात शिवसेनेचा प्रभाव आहे. सरकारमध्ये प्रमुख भागीदार शिवसेना आहे. तरी सेनेच्या माजी आमदारावर गुन्हा दाखल होतो आणि सेनेचा शहरातील एकही नेता त्यावर भाष्य करत नाही, ही गोष्ट शिवसेनेच्या संस्कृतीत बसत नाही. पोलीस ठाण्यातही राजेंद्र जंजाळ यांच्याव्यतिरिक्त सोबतीला कोणी नव्हते. म्हणजे तनवाणी यांना सेनेत एकटे पाडले गेले हे स्पष्ट होते.

अच्छा तुम्हारे शहर का दस्तुर हो गया ।

जिसको गले लगाया वो दूर हो गया ।।

हा बशीर बद्रचा शेर तनवाणींना आठवत असेल.

- सुधीर महाजन