शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

पाणलोट योजनेमुळे ओलित क्षेत्र वाढले

By admin | Updated: June 9, 2014 01:12 IST

श्रीक्षेत्र माहूर : गेल्या दोन वर्षांपासून निसर्गाची माहूर तालुक्यावर सतत अवकृपा झाल्याने दोन्ही वर्षात पावसाळी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे, शेतीचे प्रचंड नुकसान झाले़

श्रीक्षेत्र माहूर : गेल्या दोन वर्षांपासून निसर्गाची माहूर तालुक्यावर सतत अवकृपा झाल्याने दोन्ही वर्षात पावसाळी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे, शेतीचे प्रचंड नुकसान झाले़ नुकसान भरपाईसाठी आलेल्या निधीतून माहूर तालुका कृषी कार्यालयाने शेतात अनेक कामे केली़ त्यामुळे कोरडवाहू माहूर तालुक्यातील ४ हजार हेक्टर शेती ओलिताखाली आली आहे़माहूर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ५२ हजार ९३० हेक्टर असून जंगलाचे प्रमाण १० हजार २९१ हेक्टर आहे़ पैकी २०२१ हेक्टर जमीन ओसाड व लागवडअयोग्य आहे़ बिगर शेती क्षेत्र ८९६ हेक्टर आहे़ चराऊ क्षेत्र म्हणून ४४३९ हेक्टर जमीन राखीव आहे़ लागवडीलायक क्षेत्र शेती ३४ हजार ४०० हेक्टर आहे़ इसारा क्षेत्र म्हणून १५ हजार ४५० हेक्टर जमीन आहे़ तर तालुक्यात ५ हजार ३११ हेक्टर शेती सिंचनाखाली आहे़ दोन वर्षांखाली हे क्षेत्र १५०० हेक्टर होते़ गेल्या दोन वर्षापासून सतत अतिवृष्टी व नापिकी १४०० मि़ मी़ पेक्षा जास्त झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले़ त्यातल्या त्यात यावर्षी तालुक्यातील सर्वच गावांना बसलेल्या गारपिटीच्या तडाख्याने होत्याचे नव्हते झाल्याने त्याचा परिणाम लग्नसराईवरही दिसून आल्याने व्यापारी व शेतकऱ्यांना या दोन वर्षात प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला़ त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना गारपीट अनुदान देण्यात येवून शेतकऱ्यांच्या शेती शेतीदुरूस्तीसह सिंचनक्षमता वाढविण्यास कारणीभूत ठरणाऱ्या कामांना प्राधान्याने सुरुवात करणे भाग पडले़ माहूरच्या तालुका कृषी कार्यालयाकडून गतिमान पाणलोट आदिवासी उपाययोजना या योजनेअंतर्गत २०१२-१३ मध्ये तुळशी कुपटी, मलकागुडा, मलकागुडातांडा, वाईबाजार, शेलू, करंजी, वायफनी, भगवती, रुपलानाईक तांडा, लसनवाडी, सतगुडा, सिंदखेड, गोकुळ गोंडेगाव येथे साठे तीन कोटी रुपये खर्चून शेत दुरूस्तीसह बांध बंदिस्ती मातीनाला बांध, सिमेंट नाला बांध, ढाळीचे बांध आदी कामे करण्यात आली़ तर २०१३-१४ चा चालू वर्षात चोरड, भोरड, जुनापाणी, अंजनखेड, सावरखेड, गोंडवडसा, वसराम नाईकतांडा, नाईकवाडी, हरडफ या गावांत सव्वा तीन कोटी रुपये खर्चून २५०० हेक्टर शेतजमिनीवर वरील कामे अंतिम टप्प्यात आहेत़ एकूण दोन वर्षात कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार ६५०० हेक्टर श्ेत जमिनीवर जलसंधारणाची कामे वेगाने पूर्ण करण्यात येत आहेत व याआधी शेततळे अभियान राबवून १५५ शेततळी तयार करण्यात आल्याने या कामाअंती शेतजमिनीत ११ लाख क्युबिक पाणी मुरणार आहे़ जलसंधारणाची कामे मशीन्सद्वारे होत असल्याने येथे मजुरांना काम देण्याची मागणी होत आहे़ (वार्ताहर)