कुरूंदा : वसमत तालुक्यातील कुरूंदा येथे दोन वर्षापुर्वी घडलेल्या सांगाडा प्रकरणातील ‘डीएनए’ अहवाल आणण्यासाठी मुंबईला गेलेले पोलिस उपनिरीक्षक अशोक जोंधळे रिकाम्या हाती परत आले आहेत. त्यामुळे या गंभीर गुन्ह्याच्या तपासामध्ये मोठी अडचण निर्माण झाली आहे.कुरूंदा येथील जि. प. हायस्कुल जवळ एका पाण्याच्या कोरड्या टाकीत दोन मानवी सांगाडे आढळले होते. या सांगाड्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी ‘डीएनए’ चाचणीसाठी सांगाड्यांचे अवशेष पाठविले होते. दोन वर्षापासून डीएनए अहवाल प्राप्त होत नसल्याने एका पोलिस अधिकाऱ्याला हा अहवाल आणण्यासाठी मागील आठवडी पाठविण्यात आले होते. तोही अधिकारी मुंबई येथून रिकाम्या हाताने परतला आहे. टाकीमध्ये सापडलेला हा सांगाडा एका तरुण व तरुणीचा होता. गावातील बेपत्ता युवक साईनाथ इंगोले याचा सांगाडा असल्याचा संशय त्याच्या आई-वडिलांनी व्यक्त केला होता. त्यामुळे कुरूंदा पोलिसांनी साईनाथ इंगोले याच्या आई-वडिलांचे व एका बेपत्ता महिलेच्या नातेवाईकांच्या रक्ताचे नमुने ‘डीएनए’साठी दोन वर्षापुर्वी मुंबईच्या कालिना प्रयोगशाळेत पाठविले होते. दोन वर्षापासून ‘डीएनए’चा अहवाल न आल्याने विविध तर्कवितर्क लावले जात होते. मध्यंतरी प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण उचलून धरल्याने गेल्या आठवड्यात एका फौजदाराला डीएनए अहवाल आणण्यासाठी पाठविले होते; परंतु पोलिस अधिकारी जोंधळे तीन दिवस थांबूनही कालीना प्रयोगशाळेने डीएनए अहवाल दिला नाही. किमान १५ दिवसांनतर हा अहवाल देण्याचे आश्वासन त्या अधिकाऱ्याला मुंबईच्या कालीना प्रयोगशाळेकडून देण्यात आले आहे. त्यामुळे त्या फौजदाराला ‘डीएनए’ अहवालाशिवाय रिकाम्या हाताने परतावे लागले आहे.मुंबईच्या प्रयोगशाळेतून सांगाड्याचा डीएनए अहवाल येतो की नाही? याबद्दल सध्या संभ्रमावस्था असून डीएनए अहवालाअभावी पोलिस अडचणीत येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले असताना सांगाडा प्रकरणी तपासाला अद्याप गती मिळालेली नाही. डीवायएसपी पियुष जगताप यांच्याकडे हा तपास आहे. पुन्हा नव्याने तपास करण्यासाठी पोलिस प्रयत्न करीत आहेत. १५ दिवसानंतर डीएनए अहवाल येतो की, पुन्हा तारीख मिळते याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, वसमतचे उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांनी कुरूंदा येथे मृताच्या नातेवाईकांसह साक्षीदारांचे नव्याने जवाब नोंदविले. या प्रकरणाच्या तपासाला त्यांनी नव्याने सुरूवात केली आहे. (वार्ताहर)पंधरा दिवस लागणार वसमत तालुक्यातील कुरूंदा येथे दोन वर्षापुर्वी जि.प. हायस्कुल जवळ एका पाण्याच्या कोरड्या टाकीत दोन मानवी सांगाडे आढळले होते.हा सांगाडा एका तरुण व तरुणीचा होता. गावातील बेपत्ता युवक साईनाथ इंगोले याचा सांगाडा असल्याचा संशय त्याच्या आई-वडिलांनी व्यक्त केला होता. या सांगाड्यांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी ‘डीएनए’ चाचणीसाठी सांगाड्यांचे अवशेष पाठविले होते. तसेच साईनाथ इंगोले याच्या आई-वडिलांचे व एका बेपत्ता महिलेच्या नातेवाईकांच्या रक्ताचे नमुने ‘डीएनए’साठी प्रयोगशाळेत पाठविले होते. पोलिसांनी ‘डीएनए’चा अहवाल न आणल्याने विविध तर्कवितर्क लावले जात होते. मध्यंतरी प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण उचलून धरल्याने गेल्या आठवड्यात एका फौजदाराला अहवाल आणण्यास पाठविले होते.पोलिस अधिकारी तीन दिवस थांबूनही कालीना प्रयोगशाळेने डीएनए अहवाल दिला नाही.
अधिकारी रिकाम्या हातानेच परतले
By admin | Updated: June 25, 2014 00:40 IST