औरंगाबाद : दिवाळीच्या काळात उडविण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे जखमी होण्याच्या प्रमाणात जनजागृतीमुळे यंदा घट झाल्याचे दिसत आहे; परंतु तरीही जखमींची संख्या ५० च्या घरात असल्याचे समोर आले आहे. फार कमी रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.दिवाळीनिमित्त दरवर्षी लाखोंच्या फटाक्यांची विक्री होते. यंदा ऐन दिवाळीत जि. प. मैदानावरील फटाका बाजारास आग लागल्याची घटना घडली. या घटनेत सुदैवाने कोणी गंभीर जखमी झाले नाही. ३० आॅक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन आणि ३१ आॅक्टोबर रोजी दिवाळी पाडव्यानिमित्त मोठ्या प्रमाणात फटाके उडविण्यात आले. पुरेशी खबरदारी न घेतल्यामुळे या दोन दिवशी फटाक्यांनी अनेक जण जखमी आणि भाजले गेले. घाटीत दोन दिवसांत १५ जणांनी उपचार घेतले.डॉ. रमाकांत बेंबडे यांनी सांगितले, फटाक्यांमुळे भाजलेल्या १६ रुग्णांवर उपचार करण्यात आले. यामध्ये एका रुग्णास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वरित रुग्ण हे किरकोळ जखमी होते.गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत मागील वर्षापासून फटाक्यांनी जखमी होणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणात घट होत आहे. जनजागृतीमुळे ही घट होत असल्याचे त्यांनी सांगितले. भाजलेल्यांमध्ये लहान मुलांची काहीशी संख्या अधिक आहे.
फटाक्यांनी जखमींची संख्या ५० च्या घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2016 00:49 IST