शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

आता विद्यापीठातील नवीन जागेत छत्रपतींचा पुतळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:06 IST

औरंगाबाद : आता छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा विद्यापीठातील वनस्पती उद्यानाच्या जागेऐवजी प्रशासकीय इमारतीसमोरील लंच होमच्या बाजूला मोकळ्या जागेत ...

औरंगाबाद : आता छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा विद्यापीठातील वनस्पती उद्यानाच्या जागेऐवजी प्रशासकीय इमारतीसमोरील लंच होमच्या बाजूला मोकळ्या जागेत उभारण्याचा निर्णय विद्यापीठाच्या पुतळा उभारणी समितीने सोमवारी घेतला.

विद्यापीठातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंबंधी प्रशासनाने संजय निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती नेमलेली आहे. या समितीने या वादावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत निंबाळकर, किशोर शितोळे, डॉ. राजेश करपे, डॉ. फुलचंद सलामपुरे, म्हस्के व कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी आदींनी विद्यापीठातील तीन जागांवर चर्चा केली. यात इतिहास विभागामध्ये गर्द झाडी असल्यामुळे पुतळा झाकून जाईल. सामाजिकशास्त्रे विभागाच्या बाजूला पोस्ट कार्यालयाजवळ वनस्पती उद्यान असल्यामुळे पुन्हा वाद उद्‌भवू शकतो म्हणून ती जागाही नाकारण्यात आली. शेवटी प्रशासकीय इमारतीसमोर शहर वाहतूक बसथांब्याच्या बाजूला लंच होमशेजारील मोकळ्या जागेत पुतळ्यासाठी सर्वानुमते जागा निश्चित करण्यात आली.

विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागे वनस्पती उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांचा नियोजित पुतळा उभारला जाणार होता. अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त साधून संबंधित कंत्राटदाराने पुतळ्याच्या उभारणीसाठी जागेच्या सपाटीकरणाला सुरुवात केली होती. त्यावरून मोठे वादंग पेटले. विविध पक्ष-संघटनांनी वेगवेगळे तर्क काढून प्रशासनाला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. स्वाभिमानी मुप्टा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शंकर अंभोरे यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विरोध नाही; परंतु त्यासाठी निवडलेल्या जागेमुळे वनस्पतीशास्त्र विभागाचे उद्यान व जैवविविधता नष्ट होण्याची शक्यता आहे, असा आरोप केला. इको निड्‌स फाउंडेशननेही हाच धागा पकडत या उद्यानातील अनेक दुर्मीळ वनस्पती नष्ट झाल्यास विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील प्रात्यक्षिके व संशोधनाला मुकावे लागेल, अशी शंका उपस्थित केली, तर सर्वप्रथम रिपाइं युवक आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष नागराज गायकवाड दोन्ही महापुरुषांची तोंडे एकमेकांच्या विरोधी दर्शवून यातून विद्यार्थी व समाजाला कोणता संदेश देणार आहात, असा विद्यापीठाला प्रश्न विचारला होता. पुतळ्याच्या भूमिपूजनाअगोदरच हा वाद वाढत चालल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्याला कोणाच्या सांगण्यावरून हा उपद्व्याप केला, असा जाब विचारला होता.

चौकट....

व्यवस्थापन परिषदेत होणार अंतिम निर्णय

विद्यापीठातील पुतळ्यासंबंधीच्या समितीने नियोजित जागा बदलण्याचा निर्णय घेतल्यानंतर हा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेसमोर ठेवला जाईल. तिथे तो मान्य झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्प कार्यालयास जागा बदलल्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.